Pakistan Airstrik : इस्लामाबाद : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक केला आहे. त्यात ३० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार प्रांतातील स्थानिक अधिकार्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. पाकिस्ताने शुक्रवारी रात्री पेसा मिला आणि मीर सफर भागात एअरस्ट्राईक केला आहे. तसेच खोस्त प्रांताच्या स्पेरा जिल्ह्यातही हवाई हल्ला केल्याचे स्थानिक नागरिकांनी दिले आहे. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील अनेक लोक मारल्याचे वृत्त आहे. (pakistan air strike afghanistan more than 30 people died include women and children's)
Hundreds of Afghans staged protest against #Pakistan airstrike on Khost and Kuner provinces.#Afghanistan pic.twitter.com/vq3skUSCtD
— Pajhwok Afghan News (@pajhwok) April 16, 2022
कुनार प्रांताच्या शाल्ट जिल्ह्यातेले स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या हल्ल्यात पाच लहान मुले आणि एक महिलेचा मृत्यू झाला आहे. असे असएल तरी पाकिस्तानच्या सरकारने आणि अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु पाकिस्तानी माध्यमांनी या प्रांतातील तहरीक ए तालिबान आणि पश्तून इस्लामी दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. तहरिक ए तालिबान ही दहशतवादी संघटना आहे. ही संघटना पाकिस्तानच्या वजिरीस्तान भागात सक्रिय असून २००७ पासून या संघटनेचे आणि पाकिस्तानी सैन्यासोबत झटापटी सुरू आहे.
Pakistani Ambassador to Kabul Summoned to the Ministry of Foreign Affairs, today.
— Ministry of Foreign Affairs - Afghanistan (@MoFA_Afg) April 16, 2022
Along with the IEA Foreign Minister Mawlawi Amir Khan Muttaqi, the session also included Deputy Defense Minister Alhaj Mullah Shirin Akhund where
the Afghan side condemned the recent pic.twitter.com/MEaTWqThFc
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैनिकांनी अफगाणिस्तानच्या काही गाडी चालकांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. त्यात एका गाडी चालकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानातील आपल्या राजदुताला परत बोलावले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये गोळीबार झाला. यावरून पाकिस्तानने नाराजी दर्शवली असून यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.
पाकिस्तानच्या वजिरीस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे ८ सैनिक मारले गेले अहएत. गुरूवारी दहशतवाद्यांनी सैनिकांच्या मार्गावर दबा धरून हल्ला केला. दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैनिकांवर अंदाधुंद गोळीबा केला आणि त्यात पाकिस्तानचे ८ सैनिकांचा जागीच मृत्यू झाला.