पाकिस्तानच्या लेफ्टनंट कर्नलची हत्या, बलूच बंडोखोरांची कारवाई

Pakistan Army Officer Kidnapped Killed By Baloch Liberation Army Responsible For Baloch Genocide : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात एक मोठी घटना घडली. या घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. पाकिस्तानच्या आर्मीसाठी ही घटना म्हणजे मोठा धक्का समजला जात आहे.

Pakistan Army Officer Kidnapped Killed By Baloch Liberation Army Responsible For Baloch Genocide
पाकिस्तानच्या लेफ्टनंट कर्नलची हत्या, बलूच बंडोखोरांची कारवाई  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानच्या लेफ्टनंट कर्नलची हत्या, बलूच बंडोखोरांची कारवाई
  • लेफ्टनंट कर्नल लईक बेग पाकिस्तानच्या आर्मीच्या बाराव्या आझाद कश्मीर रेजिमेंटमध्ये होता
  • काही काळापासून लईक बेग मिलिट्री इंटेलिजन्स विभागात काम करत होता

Pakistan Army Officer Kidnapped Killed By Baloch Liberation Army Responsible For Baloch Genocide : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात एक मोठी घटना घडली. या घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. पाकिस्तानच्या आर्मीसाठी ही घटना म्हणजे मोठा धक्का समजला जात आहे.

बलुचिस्तान प्रांतात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या सदस्यांनी पाकिस्तानच्या आर्मीचा लेफ्टनंट कर्नल लईक बेग याचे अपहरण केले. नंतर बेगची हत्या करण्यात आली. पाकिस्तानच्या आर्मीने लेफ्टनंट कर्नल लईक बेग याचा मृतदेह बलुचिस्तानमधील एका ठिकाणावरून ताब्यात घेतला आहे. 

अनेक बलुची नागरिकांच्या अपहरण आणि हत्यांसाठी कारणीभूत असल्यामुळेच लईक बेगला शिक्षा दिली, असे सांगत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने त्यांच्या कृत्याचे समर्थन केले आहे. ही बदल्याची कारवाई आहे, असेही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने जाहीर केले.

लेफ्टनंट कर्नल लईक बेग पाकिस्तानच्या आर्मीच्या बाराव्या आझाद कश्मीर रेजिमेंटमध्ये होता. मागील काही काळापासून तो मिलिट्री इंटेलिजन्स विभागात काम करत होता.

बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या माहितीनुसार रात्री १२ आणि १३ जुलै दरम्यान कारवाई करून लेफ्टनंट कर्नल लईक बेगचे अपहरण करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लईक बेग क्वेट्टा येथून निघाला होता आणि रस्त्यावरून कारने प्रवास करत होता. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या सदस्यांनी घेराव घालून हाय वे वर लईक बेगची कार अडवली आणि त्याचे अपहरण केले. अपहरणाची माहिती मिळताच पाकिस्तानच्या आर्मीने ठिकठिकाणी पथके पाठवून बेगचा शोध सुरू केला. अखेर एका ठिकाणी बेगचा मृतदेह मिळाला. 

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने बेगला ठार केल्याचे जाहीर केले. लिबरेशन आर्मीच्या विशेष तुकडीने बेगला शिक्षा दिली, असे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून सांगण्यात आले. बेगसोबत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही त्रास दिलेला नाही. आमचा उद्देश फक्त बेगला शिक्षा देणे एवढाच होता आणि तो पूर्ण झाला असेही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने जाहीर केले. बेगने त्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली यानंतर त्याला शिक्षा दिली, असेही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून सांगण्यात आले.

पाकिस्तानच्या आर्मीतील अधिकाऱ्यांची एक यादी तयार केली आहे. या यादीतील अधिकाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आमचे सदस्य सक्रीय झाले आहेत, असा धमकीवजा इशारा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या आर्मीला दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी