नियंत्रणरेषेवर पाकिस्तानचा गोळीबार अद्याप चालूच, भारताने वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून व्यक्त केली नाराजी

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 15, 2020 | 14:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

India summons Pakistan: भारताने नियंत्रणरेषेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करून या कारवायांबाबतची आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Indo-Pak flags
नियंत्रणरेषेवर पाकिस्तानचा गोळीबार अद्याप चालूच, भारताने वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून व्यक्त केली नाराजी  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पाकिस्ताकडून सातत्याने केले जात आहे शस्त्रसंधीचे उल्लंघन
  • याबद्दल भारताने नोंदवला तीव्र आक्षेप, द्विपक्षीय कराराची करून दिली आठवण
  • पाकिस्तान उच्चायोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करून भारताने नोंदवली नाराजी

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) नियंत्रणरेषेजवळील (Line of Control) भागांमध्ये पाकिस्तानकडून (Pakistan) सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन (ceasefire violation) होत आहे, ज्याचे सडेतोड उत्तर भारताकडून (befitting answer from India) दिले जात आहे. यादरम्यान भारताने दिल्लीतील (Delhi) पाकिस्तान उच्चायोगाच्या (Pakistan envoy) वरिष्ठ अधिकाऱ्यांना (senior officers) पाचारण (summon) करून याबाबतचा आपला निषेध नोंदवला (expresses discontent) आहे. भारताने नियंत्रणरेषेजवळ निर्दोष नागरिकांना जाणूनबुजून लक्ष्य (targeting innocent civilians) केले जाण्याची कडक शब्दांत निंदा (condemnation in stern words) केली.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यानुसार पाकिस्तान उच्चायोगाचे ‘चार्ज दी अफेअर्स’ यांना भारताने पाचारण करून तीव्र रोष व्यक्त केला आणि म्हटले की सणासुदीच्या दिवसांत गोळीबार करून शांतिभंग करणे आणि हिंसा भडकवणे हे निंदनीय आहे. भारताची ही प्रतिक्रिया दिवाळीच्या एक दिवस आधी नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी जवानांकडून कोणत्याही चिथावणीशिवाय करण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर आली आहे.

आतंकवाद आणि घुसखोरीचा केला विरोध

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सीमेवर आतंकवाद्यांची घुसखोरी आणि त्यात पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल आक्षेप नोंदवले. तसेच पाकिस्तानला द्विपक्षीय कराराची आठवण करून दिली आणि सांगितले की त्यांनी आपल्या नियंत्रणात्मक भूमिकेचा वापर भारताच्या विरोधात आतंकवादी कारवायांसाठी करू नये. पाकिस्तानकडून शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या उरी क्षेत्रापासून ते गुरेज क्षेत्रापर्यंत अनेक ठिकाणी नियंत्रणरेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले ज्यात पाच जवानांसह ११ लोकांचा मृत्यू झाला होता.

भारताने पाकिस्तानला दिले सडेतोड उत्तर

पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराचे उत्तर भारतानेही तितकेच सडेतोड दिले आहे ज्यात पाकिस्तानचे आठ जवान ठार झाले तर इतर १२ जखमी झाले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या या कारवाईत पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या अनेक महत्वाच्या ठिकाणांची हानी झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी