POK हा भारताचा भाग आहे, हे पाकिस्तानने मान्य केले का? हा घ्या पुरावा

लोकल ते ग्लोबल
Updated May 22, 2020 | 18:36 IST | नवभारत टाइम्स

पाकिस्तानने कोरोनासाठी बनवलेल्या वेबसाईटवर जारी केलेल्या मॅपमध्ये पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर भारताचा हिस्सा असल्याचे दाखवले आहे.

india pakistan flag
POK हा भारताचा भाग आहे, हे पाकिस्तानने मान्य केले का? 

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानच्या कोरोना साईटवर वादग्रस्त नकाशा
  • पीओके भारताचा भाग असल्याचे नकाशात दिसले
  • सोशल मीडियावर युजर्सनी पकडली पाकिस्तानची चुकी

इस्लामाबाद: गेल्या काही दिवसांपासून भारताकडून गिलगिट-बलुचिस्तानचे हवामान सांगितले जात असल्याने पाकिस्तान चांगलाच खवळला होता. पाकिस्तानने पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरवर हक्क दाखवण्यास सुरूवात केली होती. इतकंच नव्हे भारताला प्रत्युत्तर म्हणून जम्मू-काश्मीर आणि लडाखचे तापमान सांगण्यासही सुरूवात केली होती. मात्र त्यांचे हे फासे त्यांच्यावरच उलटले. यातच पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असल्याचे स्वत:च घोषित केले आहे.

भारतात पाकव्याप्त काश्मीरचा समावेश

पाकिस्तानने कोरोना व्हायरससाठी एक वेगळी वेबसाईट बनवली आहे. या वेबसाईटमध्ये एक नकाशा दाखवण्यात आला आहे. यात भारतही दिसत आहे. दरम्यान, या नकाशामध्ये पाकव्याप्त काश्मीर हा भाग भारताचा असल्याचे खुद्द पाकिस्तानने सांगितले आहे. ही बाब सोशल मीडिया युजर्सच्या लगेच लक्षात आली. ज्या भागासाठी पाकिस्तान ओरडत आहे की आमचा आहे आमचा आहे. मात्र त्यांनी स्वत:हूनच हे मान्य केलंय की पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग आहे. त्यामुळे आता सगळीकडेच पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे.

या कारणामुळे असा दिसला नकाशा

खरंतर, पाकिस्तानने हे मुद्दाम केले नाही. साईटवर अपलोड करण्यात आलेला नकाशा मायक्रोसॉफ्टने बनवण्यात आला आहे. सीमांवरून सुरू असलेल्या वादांमुळे हा नकाशा प्रत्येक देशात वेगवेगळा दिसतो. ज्या देशांत जो नकाशा अधिकृतरित्या मान्य आहे तेथील लोकांना तो तसाच दिसतो. त्यामुळे भारतातील युजर्सना पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग दिसतो. मात्र याचा अर्थ असा नाही की पाकिस्तान आपल्या दाव्यापासून हटला आहे.

भारताच्या बुलेटिनची केली नक्कल

याआधी हवामान विभागाने जम्मू-काश्मीर सब डिव्हिजनला आता जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद हे नाव दिले. गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादवर पाकिस्तानने अवैधरित्या कब्जा केला आहे. इतकंच नव्हे तर आयएमडीचे डायरेक्टर जनरल मृत्यूंजय महापात्रा म्हणाले, भारतीय हवामान विभाग जम्मू आणि काश्मीर आणि लडाखसाठी हवामान बुलेटिन जारी करत राहील. आम्ही बुलेटिनमध्ये गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादचाही उल्लेख करत आहोत कारण तो भारताचा भाग आहे.

यानंतर पाकिस्तानने आपल्या बुलेटिनमध्ये जम्मू-काश्मीरचे जम्मू, श्रीनगर आणि पुलवामा आणि लडाखचे तापमान सांगण्यास सुरूवात केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी