पाकिस्तानमधील गाढवांच्या संख्येत होत आहे वेगाने वाढ

Pakistan Donkey Population Is Increasing Constantly Reached To 5.7 Million Last Year : पकिस्तानमधील गाढवांच्या संख्येत दरवर्षी वेगाने वाढ होत आहे. मागच्या वर्षीच्या मोजणीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

Pakistan Donkey Population Is Increasing Constantly Reached To 5.7 Million Last Year
पाकिस्तानमधील गाढवांच्या संख्येत होत आहे वेगाने वाढ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानमधील गाढवांच्या संख्येत होत आहे वेगाने वाढ
  • मागच्या वर्षीच्या मोजणीचा अहवाल प्रसिद्ध
  • पाकिस्तानमधील गाढवांची संख्या ५७ लाखांपेक्षा जास्त

Pakistan Donkey Population Is Increasing Constantly Reached To 5.7 Million Last Year : इस्लामाबाद : पकिस्तानमधील गाढवांच्या संख्येत दरवर्षी वेगाने वाढ होत आहे. मागच्या वर्षीच्या मोजणीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार पाकिस्तानमधील गाढवांची संख्या ५७ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. 

पाकिस्तानच्या २०२१-२२च्या आर्थिक सर्व्हेक्षणात गाढवांच्या संख्येची दखल घेण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये ४.३७ कोटी म्हशी, ३.१९ कोटी शेळ्या, ३.१९ कोटी बकऱ्या, ११ लाख उंट, ४ लाख घोडे, २ खेचरे आहेत. आर्थिक सर्व्हेक्षणात समावेश केलेल्या या प्राण्यांमुळे पाकिस्तानच्या जीडीपीमध्ये १४ टक्क्यांची आणि अॅग्रीकल्चरल व्हॅल्यूमध्ये ६१.९ टक्क्यांची वाढ झाली. पाकिस्तानच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत प्राण्यांना महत्त्व आहे. या प्राण्यांमुळे सामानाची वाहतूक, प्रवास, दूध, लोकर, मृत प्राण्यांची कातडी कमावणे अशा वेगवेगळ्या व्यवसायांना चालना मिळाली आहे. 

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या आव्हानांना सामोरी जात आहे. इंधन टंचाई, ऊर्जा टंचाई या समस्यांचे स्वरुप गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानची परंपरागत ग्रामीण अर्थव्यवस्था प्राण्यांच्या आधारे सक्रीय आहे. ग्रामीण भागात अर्थचक्र सुरू राहणे आणि या अर्थचक्राला गती येणे हे प्राण्यांवर अवलंबून असल्याची बाब पाकिस्तानच्या आर्थिक सर्व्हेक्षणातून अधोरेखीत करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या शहबाझ शरिफ सरकारने पेट्रोल प्रति लिटर ३० रुपये आणि डिझेल प्रति लिटर ३० रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. इंधनाच्या दरात एकदम ३० रुपये प्रति लिटर वाढ झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये सर्वच गोष्टी महागल्या आहेत. रात्री लग्न सोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. कार्यालयांना शुक्रवार आणि शनिवार अशी दोन दिवसांची सुटी देऊन विजेची बचत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

चीन त्यांच्या डोंगराळ भागात सामानाच्या वाहतुकीसाठी गाढवांचा वापर करतो. यासाठी काही काळापूर्वी चीनने पाकिस्तानमधूनच गाढवांची आयात केली होती. थकलेल्या गाढवांना ठार करून त्यांच्या कातडीचा वापर जिलेटिन निर्मिती प्रक्रियेत केला जातो. प्रत्येक मृत गाढवाच्या कातडीतून पाकिस्तानला सुमारे १५ ते २० हजार रुपयांची कमाई होते.  अशा वेगवेगळ्या कारणांमुळे प्राणी हेच पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा आधार झाले आहेत. 

उपलब्ध आकडेवारीनुसार पाकिस्तानमधील ८० लाख ग्रामीण कुटुंबाच्या एकूण आर्थिक उत्पन्नात प्राण्यांची भूमिका ३५ ते ४० टक्के एवढी मोठी आहे. आर्थिक आव्हानांना सामोरा जात असलेला पाकिस्तान याच कारणामुळे देशातील पशूधन जपण्याला प्राधान्य देत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी