VIDEO: पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड, पुलवामा हल्ल्याची दिली कबुली 

पाकिस्तानचा दहशतवादी कारवायांना असलेलं समर्थन यापूर्वी अनेकदा समोर आले आहे. त्यानंतर आता स्वत: पाकिस्तानच्या मंत्र्यानेच दहशतवादी हल्ल्याची कबुली दिली आहे. 

Pakistan Federal Minister Fawad Choudhry
पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड, पुलवामा हल्ल्याची दिली कबूली   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर झाला उघड
  • पाकिस्तान सरकारमधील मंत्र्यानेच संसदेत दहशतवादी हल्ल्याची कबुली देत केलं समर्थन

नवी दिल्ली : पाकिस्तान (Pakistan)कडून दहशतवादाला खतपाणी घालण्यात येत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. तर पाकिस्तान नेहमीच दहशतवादाला विरोधात असल्याचा दावा करत आलं आहे. पण आता पाकिस्तानचा चेहरा जगासमोर उघड झाला आहे. कारण, पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी (Pakistan Federal Minister Fawad Choudhry) यांनी संसदेत कबुल केले आहे की, पुलवामा दहशतवादी हल्ला इम्रान खान सरकारच्या संरक्षणाखाली करण्यात आला होता. पुढे फवाद म्हणाले, इमरान खान यांच्या नेत्रृत्वात पुलवामा ही एक मोठी कामगिरी होती. (Pulwama was a great achievement under Imran Khan's leadership says Fawad Choudhry)

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले होते. भारतीय सैन्याने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मोठ्या संख्येत दहशतवादी मारले गेले होते. तसेच दहशतवाद्यांचे अड्डेही भारतीय सैन्याने उद्धवस्त केले होते.

फवाद चौधरी यांच्या अगोदर इमरान खान यांच्या पक्षाच्या एका खासदाराने खुलासा केला होता की, भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांना सोडावे लागले कारण त्यांना सोडले नसते तर पाकिस्तानवर हल्ल्यासाठी भारत तयार होता. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांचे भीतीने घाबरले होते आणि पायही थरथरत होते. त्यामुळे अभिनंदन यांची सुटका करावी लागली.

पाकिस्तानात अनेक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. या दहशतवादी संघटना भारतात दहशतवादी हल्ले करत असतात. तसेच भारतीय हद्दीत दहशतवादी घुसत असताना त्यांच्या आडून पाकिस्तानी सैन्य हल्ला करत असल्याचंही अनेकदा समोर आलं आहे. मात्र, या सर्व गोष्टी पाकिस्तान नेहमीच फेटाळत असे पण आता पाकिस्तान सरकारमधील मंत्र्यानेच दहशतवादी हल्ल्याची कबुली दिली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानचा चेहरा सर्वांसमोर उघड झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी