नवाज शरीफ यांच्यानंतर पाकिस्तानचे आणखी एका माजी पंतप्रधान अटकेत

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 18, 2019 | 19:41 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना अटक करण्यात आली आहे. अब्बास यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. 

shahid abbasi
शाहिद अब्बासी 

थोडं पण कामाचं

  • अब्बासी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप
  • अब्बासी नवाज शरीफ यांच्या पक्षाशी संबंधित आहेत.
  • नवाज शरीफ सध्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात

इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये अटक केल्याच्या घटना काही थांबत नाही आहेत. भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांमुळे तुरूंगात जावे लागलेल्या नवाज शरीफ यांच्यानंतर आता आणखी एक माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग अब्बासी यांना आज पाकिस्तानच्या एनएबीने नैसर्गिक गॅस आयात संबंधित अब्जावधींचा घोटाळा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार, ही अटक तेव्हा झाली जेव्हा अब्बासी एका प्रेस कॉन्फरन्सला जात होते यावेळी ठोकर नियाज बेग स्थित टोल प्लाझावर त्यांना अटक करण्यात आली.

एनएबीने याप्रकरणी आजच अब्बासी यांना समन्स जारी केले होते. एनएबीने नोटीसमध्ये म्हटले होते, तुम्हाला विनंती आहे की एलएनजी टर्मिनलवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक साधसंपत्ती मंत्री म्हणून तुमचा जबाब नोंदवण्यासाठी १८ जुलैला सकाळी १० वाजता एनएबी इस्लामाबादमध्ये उप-निदेशक मलिक जुबैर अहमद यांच्यासमोर उपस्थित राहावे लागेल. 

अब्बास यांच्या अटकेवरून सवाल उपस्थित

अब्बास यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. पाकिस्तानचा अध्यादेश १९९९ च्या कलम ९(ए) अंतर्गत भ्रष्टाचार आणि भ्रष्ट आचरणाचा त्यांच्यावर आरोप आहे. नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तानी मुस्लिम लीगने अब्बासी यांच्या अटकेबाबत ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे. नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे एनएबी नाजी इमरान खान यांच्या हातात. अब्बासी यांच्या अटकेने आम्ही घाबरणार नाही. 

तुरुंगात कैद आहेत नवाज

नवाज शरीफ सध्या तुरूंगात बंद आहेत. २०१६मध्ये पनामा पेपर लीक प्रकरणात नाव समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने त्यांना अयोग्य असा करार दिला होता. त्यानंतर त्यांना आपले पद सोडावे लागले होते.  ६९ वर्षीय नवाझ शरीफ २४ डिसेंबर २०१८ पासून लाहोरच्या कोट लखपत जेलमध्ये बंद आहेत. ते भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. काही दिवसांपूर्वीच नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाझने इमरान खान यांच्यावर निशाणा साधताना म्हटले होते, तिच्या वडिलांना खोट्या खटल्यामध्ये तुरूंगात पाठवण्यात आले आहे. 

नवाज यांनी उपचारासाठी जामीन मागितला होता. मात्र इमरान खान यांनी नकार दिला होता. ते म्हणाले, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या लोकांना बाहेर पडता येणार नाही. शरीफ यांच्यावर असेही आरोप होते की, त्यांनी २०१६मध्ये प्रस्तावित शिखर संमेलनासाठी आयात करण्यात आलेल्या २० बुलेटप्रूफ वाहनांचा वापर स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबासाठी केला होता. यासाठी कोर्टात सुनावणीही झाली होती.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
नवाज शरीफ यांच्यानंतर पाकिस्तानचे आणखी एका माजी पंतप्रधान अटकेत Description: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना अटक करण्यात आली आहे. अब्बास यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...