बदला! पाकिस्तानच्या ५ वेबसाईट हॅक, वेबसाईटवर वाजतेय 'वंदे मातरम'

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 11, 2019 | 22:19 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Pakistan govt website hacked: अमिताभ बच्चन यांचं सोमवारी ट्विटर अकाऊंट हॅक झालं. त्यानंतर आज पाकिस्तानच्या या कुरापतीचा चांगलाच बदला घेण्यात आला आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या पाच वेबसाईट हॅक केल्या आहेत. 

Pakistan flag
बदला! पाकिस्तानच्या ५ वेबसाईट हॅक, वेबसाईटवर वाजतेय 'वंदे मातरम' 

मुंबईः  बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांचं सोमवरी ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं. त्याच्याच बदल्यात आज मंगळवारी पाकिस्तानच्या ५ वेबसाईट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांचं जेव्हा अकाऊंट हॅक झालं तेव्हा त्यांच्या होमपेजवर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो होता. आज त्याच्या उलट गोष्टी घडल्या. पाकिस्तानच्या ज्या वेबसाईट हॅक केल्या गेल्या त्या वेबसाईटच्या होमपेजवर अमिताभ बच्चन आणि भारतीय तिरंग्याचा फोटो दिसत होता. त्यासोबतच ज्या वेबसाईट हॅक केल्या होत्या त्या ओपन करताच वंदे मातरम या गाणं ऐकू येत होतं.  त्यामुळे अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक केल्याचा बदला घेण्यात आला आहे. 

सोमवारी अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट काही वेळासाठी हॅक झालं होतं. अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हे तुर्कीश सायबर आर्मी 'अयिल्दिज तिम' ने हे ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची माहिती समोर आली आहे. अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर्सने टर्की आणि पाकिस्तान संबंधित काही मेसेजेसही पोस्ट केले होतं. ट्विटर अकाऊंटवरुन लव्ह पाकिस्तान असंही ट्विट करण्यात आलं होतं. 

ab

अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक केल्यावर हॅकर्सने त्यांच्या प्रोफाईल फोटोच्या जागेवर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो लावला होता.. त्यानंतर पोस्ट केलं, 'हा संपूर्ण जगासाठी एक महत्वपूर्ण संदेश आहे. तुर्कस्तानच्या फुटबॉलपटूंना आइसलँड रिपब्लिकने दिलेल्या वागणूकीचा आम्ही निषेध करतो.' यानंतर हॅकर्सने पुढे पोस्ट केलं की, 'एक मोठा सायबर हल्ला होणार आहे'. यानंतर त्यांनी आपला लोगो सुद्धा शेअर केला होता. 

अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. मग ते इंस्टाग्राम असो किंवा ट्विटर किंवा फेसबुक सुद्धा, कायम ते काहीतरी शेअर करताना, त्यांच्या फॅन्ससी संवाद साधताना दिसतात. त्यांच्या ट्विटरवर तर तब्बल 37.7 मिलियन फॉलोअर्स आहेत.

आताच समोर आलेल्या माहितीनुसार, सिंगर अदनान सामीचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. अदनानचं अकाऊंट हॅक होताच त्याचा प्रोफाईल फोटो, कव्हर फोटो आणि बायो लिंक बदलण्यात आली आहे. त्यासोबतच अकाऊंटवरून पाकिस्तान समर्थनासंदर्भात ट्विट करण्यात आले आहेत. 

अदनान सामीचा प्रोफाईल फोटोमध्ये त्याच्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो अपलोड केला गेला आहे. त्यांच्या कव्हर फोटोमध्ये तुर्कीस्तानचा झेंडा दिसत आहे. अदनान याच्या बायोमध्ये Ayyıldız Tim Love Pakistan' लिहिण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बदला! पाकिस्तानच्या ५ वेबसाईट हॅक, वेबसाईटवर वाजतेय 'वंदे मातरम' Description: Pakistan govt website hacked: अमिताभ बच्चन यांचं सोमवारी ट्विटर अकाऊंट हॅक झालं. त्यानंतर आज पाकिस्तानच्या या कुरापतीचा चांगलाच बदला घेण्यात आला आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या पाच वेबसाईट हॅक केल्या आहेत. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
पॉर्न सिनेमा पाहून तसेच कृत्य करणं बेतलं जीवावर, तरुणाचा मृत्यू
पॉर्न सिनेमा पाहून तसेच कृत्य करणं बेतलं जीवावर, तरुणाचा मृत्यू
[VIDEO]: दिल्लीतील एम्स रुग्णालयाला लागलेली भीषण आग अखेर आटोक्यात
[VIDEO]: दिल्लीतील एम्स रुग्णालयाला लागलेली भीषण आग अखेर आटोक्यात
UNSC: पाक पुन्हा फेल, UNमध्ये पाकिस्तान सपशेल तोंडावर आपटलं
UNSC: पाक पुन्हा फेल, UNमध्ये पाकिस्तान सपशेल तोंडावर आपटलं
Arun Jaitley Health Updates: अरूण जेटली यांची प्रकृती चिंताजनक; अमित शहा, योगी एम्समध्ये दाखल
Arun Jaitley Health Updates: अरूण जेटली यांची प्रकृती चिंताजनक; अमित शहा, योगी एम्समध्ये दाखल
पाकिस्तानकडून LoCजवळ पुन्हा गोळीबार, पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त
पाकिस्तानकडून LoCजवळ पुन्हा गोळीबार, पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑगस्ट २०१९: LoC जवळ गोळीबार ते एम्स रुग्णालयाला आग
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑगस्ट २०१९: LoC जवळ गोळीबार ते एम्स रुग्णालयाला आग
[VIDEO]: भारतविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या पाक समर्थकांना भिडल्या भारताच्या शाझिया इल्मी
[VIDEO]: भारतविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या पाक समर्थकांना भिडल्या भारताच्या शाझिया इल्मी
Artical 370: जम्मू काश्मीरमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरू, सोमवारपासून शाळा,कॉलेज होणार सुरू
Artical 370: जम्मू काश्मीरमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरू, सोमवारपासून शाळा,कॉलेज होणार सुरू