Article 370: कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान बिथरलं, घेतला विचित्र निर्णय

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 07, 2019 | 22:51 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Article 370: पाकिस्तानने आज त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलवली. बैठकीत भारताशी असणारे द्विपक्षीय संबंध तोडण्याचा तसेच, भारतीय उच्चायुक्तांना पाकमधून हद्दपार करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Pakistan PM Imran Khan meeting
पाकिस्तान बिथरले; भारताविषयी घेतला मोठा निर्णय   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी काश्मीरचा विषय संयुक्त राष्ट्रांमध्ये नेण्याची केली घोषणा
  • भारताशी सर्व प्रकारचे संबंध तोडण्याचा पाकिस्तानचा निर्णय
  • भारतीय उच्चायुक्तांना माघारी पाठवण्याचा निर्णय; पाक उच्चायुक्तांनाही भारतातून बोलवून घेणार

नवी दिल्ली : भारत सरकारने जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम ३७० हटवल्यानंतर भारतात आनंदोत्सव करण्यात येत आहे. पण, सीमेपलिकडे हा निर्णय फारसा रुचलेला नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी काल, काश्मीरचा विषय संयुक्त राष्ट्रांमध्ये नेण्याची घोषणा केली आहे. तेथील स्थानिक राजकीय नेत्यांकडून खान यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. त्याचे परिणाम आजही दिसले. आज, पाकिस्तानने त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची एक बैठक बोलवली. त्यात संरक्षण, परराष्ट्र, शिक्षण, मानवाधिकार, कायदा या खात्यांचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. पाकिस्ताने भारताशी असणारे द्विपक्षीय संबंध तोडले असून, भारतीय उच्चायुक्तांना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये फारसे मधूर संबंध नसले तरी, व्यापारी संबंध सुरूच आहेत. पण, पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाने तेदेखील संपुष्टात येणार असल्याचे दिसत आहे.

पाकचे परराष्ट्र मंत्री म्हणतात...

याबाबत पाकिस्तानचे पराराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, आम्ही आता आमच्या राजदूतांना दिल्लीतून परत बोलवणार आहोत. आता पाकिस्तान सरकारने व्यापार तसेच बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तान आता भारतीय स्वातंत्र्य दिवसाला काळा दिवस घोषित करेल. शाह मोहम्मद कुरेशी यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमध्ये आता तणाव वाढणार आहे. अद्याप पाकिस्तानला भारतीय परराष्ट्र खात्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

 

 

 

 

पाकिस्तानातील बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा?

  1. भारताशी संबंधित व्यापार संबंधांचा फेरविचार करणे
  2. भारताशी असणारा द्विपक्षीय व्यापार संपुष्टात आणणे
  3. द्विपक्षीय व्यवस्था
  4. काश्मीरचा विषय संयुक्त राष्ट्रांमध्ये उचलून धरण्याचा मद्दा

 

 

सुरक्षा दलांना दिले आदेश

पाकिस्तानात इमरान खान यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्ट काश्मिरींसोबत एकजुटीने साजरा करण्यावर चर्चा झाली तसेच भारताचा स्वातंत्र्य दिवस १५ ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून पाळण्यावरही यावेळी चर्चा झाली. भारत सरकार हे वंशभेदी असल्याचा आरोप इमरान खान यांनी केला. तसेच भारत सरकार मानवाधिकारांचे उल्लंघन करत असून, त्याचा पर्दाफाश करण्यासाठी सर्वांनी सक्रीय रहावे, असे आदेश खान यांनी दिले. खान यांनी पाकिस्तानच्या सुरक्षा दलांना दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत.

भारताला चर्चेत रस नाही : चौधरी

दरम्यान, या बैठकीपूर्वी पाकिस्तान माहिती प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनी भारत सरकारच्या निर्णयावर आपला रोष व्यक्त केला. चौधरी यांनी परराष्ट्रमंत्री कुरेशी यांना उद्देश सांगितले की, भारताला आता आपल्यासोबत चर्चा करण्यात कोणताही रस नाही. तर, त्यांचे राजनैतिक अधिकारी अजूनही आपल्या देशात का आहेत? भारताशी राजनैतिक संबंध तोडायला हवेत. त्यांचे अधिकारी आपल्या इथे असण्याचा आणि आपले त्यांच्या देशात असण्याचा काय फायदा होणार आहे? पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना हद्दपार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...