[VIDEO] IB कडून अलर्ट जारी, जैशचा म्होरक्या मसूद अजहरची सुटका

दहशतवादी भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं अलर्ट आयबीनं जारी केले आहेत.पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता असल्याचं सांगत गुप्तचर यंत्रणेनं सतर्क राहण्यासाठी सांगितलं आहे.

Representational Image
[VIDEO] IB कडून अलर्ट जारी, जैशचा म्होरक्या मसूद अजहरची सुटका  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तान भारतावर मोठा दहशतवादी करण्याच्या प्रयत्नात आहे.
  • याच कुरापतीत पाकिस्ताननं जैश- ए- मोहम्मदचा म्होरक्या दहशतवादी मसूद अजहरची सुटका केली आहे.
  • समोर आलेल्या माहितीनुसार, दहशतवादी जम्मू काश्मीर आणि राजस्थानमधील काही भागांना निशाणा बनवण्याची शक्यता आहे. 

इस्लामाबादः शेजारी देश पाकिस्तान आपल्या कुरापती थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, पाकिस्तान भारतावर मोठा दहशतवादी करण्याच्या प्रयत्नात आहे. याच कुरापतीत पाकिस्ताननं जैश- ए- मोहम्मदचा म्होरक्या दहशतवादी मसूद अजहरची सुटका केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दहशतवादी जम्मू काश्मीर आणि राजस्थानमधील काही भागांना निशाणा बनवण्याची शक्यता आहे. 

मसूद अजहरची सुटका 

रिपोर्ट्सनुसार, इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) नं राजस्थानजवळ भारत- पाकिस्तान सीमेवर अतिरिक्त पाक सैन्य तैनात करण्याबाबत सरकारला सतर्क करण्यात आलं आहे आणि इस्लामाबादमध्ये मोठ्या कारवाईची योजना आखत असल्याचं सांगितलं आहे. त्यातच पाकिस्ताननं जैश- ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरची सुटका केली आहे. माहितीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी शांतता भंग करण्याच्या तयारीत आहे. 

Masood Azhar

आयबीनं दिले इनपूट 

आयबीनं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर बिथरलं आहे. यातच पाकिस्तान येत्या दिवसात सियालकोट- जम्मू आणि राजस्थान सेक्टरमध्ये मोठी कारवाई करण्याची योजना आखत आहे. आयबीनं सरकारला गुप्त माहिती दिली आहे. आयबीनं दिलेल्या गुप्त माहितीत सरकारला सांगितलं आहे की, या योजनेचा एक भाग म्हणून पाकिस्ताननं राजस्थानच्या सीमेजवळ अतिरिक्त सैन्य तैनात करण्यास सुरूवात केली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, आयबीनं याबाबत सर्व माहिती सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि सैन्याला दिली आहे. इंटेलिजेंस एजन्सीनं सुरक्षा एजन्सी आणि सैन्याला जम्मू काश्मीर आणि राजस्थान सेक्टरमध्ये कोणत्याही परिस्थितीत अलर्ट राहण्यासाठी सांगितलं आङे. आयबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता आहे. 

Imran Khan

(फोटो आभार- पीटीआय)

बेचैन पाकिस्तान 

जम्मू काश्मीरमधून विशेष राज्याचा दर्जा हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. भारत सरकारच्या या निर्णयानंतर पाकिस्तान जगभरातल्या देशांकडे मदत मागत असून भारताच्या या निर्णयाविरोधात पाऊल उचलण्याची मागणी करत आहे. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानच्या पदरी अपयश आले. पाकिस्ताननं काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी)मध्ये ही उपस्थित केला. तेव्हाही पाकिस्तान तोंडावर पडला. त्यानंतर पाकिस्तान काश्मीरच्या मुद्द्यावर आता एकाकी पडला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...