Pakistan Inflation | पाकिस्तानात १५० रुपये किलो साखर, पेट्रोल १४५ रुपये प्रति लिटर

Pakistan Sugar Petrol Price | पाकिस्तानात साखरेचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्याचपाठोपाठ पेट्रोलच्या किंमतीतदेखील जबरदस्त वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरिक वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त झाला आहे.

Pakistan Inflation
पाकिस्तानात महागाईचा जबरदस्त तडाखा 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानात महागाई विक्रमी पातळीवर
  • साखर आणि इंधनाच्या किंमतींनी केले रेकॉर्ड
  • पाकिस्तानात साखर १५० रुपये प्रति किलो तर पेट्रोल १४५ रुपये प्रति लिटरवर

Pakistan Petrol Price | इस्लामाबाद: पाकिस्तानात सध्या महागाईचा (Pakistan Inflation) जोरदार भडका उडाला आहे. सर्वसामान्य नागरिक वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त झाला आहे. देशातील अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इमरान खान सरकारने (Imran Khan Government) केलेल्या प्रयत्नांचादेखील फारसा उपयोग झालेला नाही. पाकिस्तानात साखरेचे भाव (Sugar price in Pakistan) सातत्याने वाढत आहेत. त्याचपाठोपाठ पेट्रोलच्या किंमतीतदेखील (Petrol Price in Pakistan)जबरदस्त वाढ झाली आहे. पाकिस्तानातील वेगवेगळ्या शहरांमध्ये साखर १५० रुपये किलोने विकली जाते आहे. तर पेट्रोल सध्या १४५ रुपये प्रति लिटरच्या दराने मिळते आहे. (Pakistan Inflation: Sugar at Rs 150 per Kg & Petrol at Rs 145 per liter in Pakistan)

नफेखोरीचा सर्वसामान्यांना दणका

पेशावर येथील घाऊक बाजारात साखरेच्या भावात ८ रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. शुगर डिलर्स असोसिएशनच्या अध्यक्षांचे म्हणणे आहे की साखर १४० रुपये प्रति किलोच्या घाऊक दराने विकली जाते आहे. तर किरकोळ बाजारात पोचेपर्यत साखरेचे भाव वाढून १४५ रुपये ते १५० रुपये प्रति किलो होत आहेत. लाहोरच्या घाऊक बाजारात कालपर्यत साखरेचा भाव १२६ रुपये प्रति किलो होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साखरेचे व्यापारी अंदाधुंद नफा कमावण्यासाठी साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून भाववाढ करत आहेत.

घाऊक बाजारातदेखील भाववाढ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील घाऊक बाजारात साखरेचे भाव नऊ रुपये प्रति किलोने वाढले आहेत. अकबरी मंडीमध्ये साखरेची किंमत वाढून १३५ रुपये प्रति किलो झाली आहे. तर किरकोळ बाजारात साखर १४० रुपये प्रति किलोवर पोचली आहे. कराचीमध्ये साखरेची किंमत ऐतिहासिक उच्चांकीवर म्हणजे १४२ रुपये प्रति किलोवर पोचली आहे. आदल्याच दिवशी कराचीत साखरेची किंमत १२ रुपयांनी कमी होती.

पाकिस्तानात सर्वत्र महागाईचे राज्य

दोन आठवड्यात साखरेची कारखान्याबाहेर किंमत ४४ रुपये प्रति किलोने वाढली आहे. या भाववाढीबरोबरच साखरेची घाऊक बाजारातील किंमत १४३ रुपये प्रति किलो झाली आहे. फक्त दोनच दिवसात साखरेच्या भावात १९ रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारावरदेखील या भाववाढीचा परिणाम होणार आहे. पाकिस्तानातील क्वेटा येथे देखील साखरेचे भाव १२४ रुपये प्रति किलोवरून वाढून १२९ रुपये प्रति किलो झाले आहेत.

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना

दरम्यान पाकिस्तानात मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा (JUD) या बंदी घातलेल्या संघटनेच्या सहा वरिष्ठ नेत्यांची लाहोर उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्व 6 नेत्यांना ट्रायल कोर्टाने दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते जे उच्च न्यायालयाने रद्द केले होते. सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा ही प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची आघाडीची संघटना आहे, ज्याने मुंबई हल्ला केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी