Pakistani Airlines latest : एअर होस्टेसने विमानात योग्य अंडरगारमेंट परिधान करावे... पाकिस्तानी एअरलाइनचा विचित्र आदेश

Pakistan Airlines dress code : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने आपल्या एअर होस्टेस आणि केबिन क्रूसाठी एक धक्कादायक आदेश दिला आहे. केबिन क्रू ला योग्य अंडरगारमेंट घालणे पाकिस्तान एअरलाइन्सने सक्तीचे केले आहे. केबिन क्रूच्या ड्रेसमुळे विमान कंपनीची नकारात्मक प्रतिमा तयार होते आहे. याचा प्रवाशांवर वाईट प्रभाव पडतो आहे असे एअरलाइन्सचे म्हणणे आहे.

Pakistan International Airlines
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तान एअरलाइन्सचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत
  • पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचा नवा आदेश चर्चेचा विषय झाला आहे
  • एअर होस्टेस आणि केबिन क्रूने योग्य अंडरगारमेंट घालावे असा आदेश एअरलाइन्सने दिला आहे

Pakistan Airlines order for crew : इस्लामाबाद : एअरलाइन्स आणि एअर होस्टेस यांच्या अनेक कथा किंवा बातम्या एरवी आपण पाहत असतो. एअरलाइन्सचे (Airlines) अनेक किस्से लोकप्रियदेखील आहेत. मात्र आता तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी एक बातमी पाकिस्तानी एअरलाइन्सच्या (Pakistan International Airlines) संदर्भात समोर आली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने आपल्या एअर होस्टेस (Air Hostess) आणि केबिन क्रूसाठी (Cabin Crew) एक धक्कादायक आदेश दिला आहे. या विचित्र आदेशात एअरलाइन्सने एअर होस्टेस आणि केबिन क्रू ला योग्य अंडरगारमेंट घालणे सक्तीचे केले आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पीआयएने क्रूला सांगितले आहे की फ्लाइटमध्ये अंडरगारमेंट घालणे आवश्यक आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे म्हणणे आहे की केबिन क्रूच्या ड्रेसमुळे विमान कंपनीची नकारात्मक प्रतिमा तयार होते आहे. याचा प्रवाशांवर वाईट प्रभाव पडतो आहे. एअरलाइन्सने त्यांच्या नवीन आदेशासाठी पाकिस्तान सरकारच्या नवीन अधिसूचनेचा आधार घेतला आहे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. (Pakistan International Airlines makes mandatory for cabin crew to wear proper under garments)

अधिक वाचा- अंधेरीत हॉटेलच्या रूममध्ये मॉडेलनं संपवलं आयुष्य, सुसाईट नोटमध्ये केला मोठा खुलासा  

काय आहे एअरलाइन्सचा आदेश

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे महाव्यवस्थापक अमीर बशीर यांनी आपल्या स्टाफला पाठवलेल्या सूचनेत म्हटले आहे की, "प्रवास करताना काही केबिन क्रू हॉटेल्समध्ये राहताना आणि विविध प्रकारच्या टूर दरम्यान कॅज्युअल कपडे घालतात ही मोठी चिंतेची बाब आहे. यामुळे त्या व्यक्तीची वाईट छाप पडते. यामुळे कंपनीची नकारात्मक प्रतिमा तयार होते.

अधिक वाचा-  Pankaja Munde : नवरात्रौत्सवात पंकजा मुंडे 'झिंग झिंग झिंगाट'वर थिरकल्या; डान्सचा Video व्हायरल

बशीर यांनी केबिन क्रूला योग्य अंडरगारमेंट्सवर साध्या पोषाखात योग्यरित्या कपडे घालण्यास सांगितले आहे. "पुरुष आणि महिलांनी परिधान केलेले कपडे आमच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय नीतिनियमांनुसार असले पाहिजेत," असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, ग्रूमिंग अधिकाऱ्यांना नेहमीच केबिन क्रूवर नजर ठेवण्याची आणि नियमांचे पालन होत नसल्यास अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवाशाचा विमानात नमाज पढण्याचा प्रयत्न

एका पाकिस्तानी प्रवाशाने विमानाची खिडकी तोडण्याचा प्रयत्न केल्याने पीआयए अलीकडेच चर्चेत आली होती. हे विमान पेशावरहून दुबईला रवाना झाले होते. विमानात नमाज अदा करण्यापासून रोखल्याने प्रवाशाने गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. फ्लाइटमध्ये चढल्यावर तो प्रवासी चांगला होता आणि अचानक असे वागू लागला. विमानामध्ये त्या प्रवाशाला नमाज अदा करण्यापासून रोखले असता, त्याने गोंधळ घातला होता.

अधिक वाचा : Mumbai Crime News: अंधेरीत हॉटेलच्या रूममध्ये मॉडेलनं संपवलं आयुष्य, सुसाईट नोटमध्ये केला मोठा खुलासा

जगभरातील विविध एअरलाइन्स आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही खाश पोशाख नेमत असतात. यातून एअरलाइन्सची एक विशिष्ट प्रतिमा ग्राहकांपुढे ठेवण्याचा विमानसेवा कंपन्यांचा प्रयत्न असतो. या पोशाखांमधून त्या देशाची सांस्कृतिक ओळख निर्माण व्हावी आणि प्रवाशांमध्ये एक सकारात्मक प्रतिमा तयार होत अधिकाधिक ग्राहक आकर्षित व्हावेत हा हेतू यामागे असतो. अनेकदा विमानातील कर्मचाऱ्यांच्या वर्तणूक आणि पोशाखाला धरून वाददेखील निर्माण होत असतात. मात्र पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या या नव्या धोरणाने आणि आदेशाने तर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स चर्चेत आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी