पाकिस्तानात विमान कोसळले, विमानात ९०हून अधिक प्रवासी 

Plane crash: पाकिस्तानात एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. ९०हून अधिक प्रवासी असलेलं विमान कराची एअरपोर्टजवळ कोसळलं आहे. 

Plane crash in pakistan
पाकिस्तानात विमान कोसळले, विमानात ९०हन अधिक प्रवासी  

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, PIAचं ए ३२०  विमान झालं क्रॅश 
  • विमानात जवळपास ९० हून अधिक प्रवासी होते 
  • कराचीतील रहिवासी भागात विमानाचा अपघात 

कराची: पाकिस्तानमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. पाकिस्तान एअरलाईन्सचं एक विमान कराचीत कोसळलं आहे. या विमानाने लाहोरहून उड्डाण केलं होतं आणि कराची विमानतळावर लँडिंग होणार होतं मात्र, त्यापूर्वी विमानाला अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा विमान अपघात एका रहिवासी भागात झाला आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली. कराचीमधील मॉडल कॉलनी नावाचा परिसर या अपघातानंतर सील करण्यात आला आहे.

पाकिस्तानी मीडिया चॅनल्सच्या मते, या विमानातून पाच क्रू मेंबर्स आणि इतर ९१ प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका दाखल झाल्या.

पाकिस्तान आर्मीने जारी केलं निवेदन 

या विमान अपघातानंतर पाकिस्तानी आर्मीने ट्वीट करुन म्हटलं, "अपडेट PIA अपघात: पाकिस्तान सैन्याच्या एव्हिएशन हेलिकॉप्टर्सने नुकसानाची पाहणी आणइ बचाव प्रयत्नांसाठी उड्डाण केले आहे. घटनास्थळावर बचाव आणि मदत कार्यासाठी दल पाठवण्यात आले आहेत."

ज्या ठिकाणी ही विमान दुर्घटना झाली आहे तो एक रहिवाशी परिसर आहे आणि या भागात मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. असं म्हटलं जात आहे की, ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे त्या ठिकाणी असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीक होते.

पाकिस्तान मीडियाच्या मते, विमानाचे टायर अचानक जाम झाले आणि त्यामुळे लँडिंग गेअर उघडले नाहीत त्यानंतर काही वेळाने विमानाचा कंट्रोल रूमसोबतचा संपर्क तुटला. विमान कोसळल्यानंतर तेथे अनेक घरांमध्ये आग लागली तसेच आवाज ऐकूण नागरिकांनी घरातून पळ काढून रस्त्यावर आले. अपघातानंतर आसपासच्या ठिकाणी बरीच गर्दी जमली असून त्यामुळे पोलिसांना अडचणी येत आहेत. मोठ्या प्रमाणआत गर्दी असलेल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी