Cyber Crime: पाकिस्तान भारताविरूद्ध रचतोय षडयंत्र, शेजारील देश द्वेष पसरवण्यासाठी करतोय हे काम 

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 16, 2022 | 13:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Cyber Crime | अमेरिका, जर्मनी, कॅनडा यासह युरोपातील देशांतून काही हॅशटॅगचा वापर करून ट्विट केले जात होते, ते भारतातूनही रिट्विट केले जात होते कारण त्यांना असे वाटत होते की सर्व ट्विट्स देशातूनच होत आहेत. भारताच्या शेजारील देश पाकिस्तान सतत भारताविरूद्ध काहीना काही कुरघोड्या करत असतो. दरम्यान आता पुन्हा एकदा पाकिस्तानचा क्रूर चेहरा समोर आला आहे.

Pakistan is conspiring against India, spreading hatred against neighboring countries
पाकिस्तान भारताविरूद्ध द्वेष पसरवण्यासाठी करतोय हे काम   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तान भारताविरूद्ध सायबर हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
  • पाकिस्तान आपल्या सायबर क्राइमच्या दुनियेला अधिक मजबूत करत आहे
  • भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा खराब करणे हा त्यांचा मानस आहे.

Cyber Crime | नवी दिल्ली : अमेरिका, जर्मनी, कॅनडा यासह युरोपातील देशांतून काही हॅशटॅगचा वापर करून ट्विट केले जात होते, ती ट्विट भारतातूनही रिट्विट केली जात होतीत कारण त्यांना असे वाटत होते की सर्व ट्विट्स भारतातूनच होत आहेत. भारताच्या शेजारील देश पाकिस्तान सतत भारताविरूद्ध काहीना काही कुरघोड्या करत असतो. दरम्यान आता पुन्हा एकदा पाकिस्तानचा क्रूर चेहरा समोर आला आहे. हे पाहून सर्वांना वाटेल की पाकिस्तानचा जन्म भारताविरूद्ध कटकारस्थाने करण्यासाठीच झाला आहे. पाकिस्तान वारंवार भारताविरूद्ध काही ना काही कारस्थान रचत असतो. यावेळी पाकिस्तानने एक वेगळा मार्ग निवडला आहे. (Pakistan is conspiring against India, spreading hatred against neighboring countries). 

पाकिस्तान आपल्या सायबर क्राईमच्या दुनियेला अधिक मजबूत करत आहे आणि सायबर गुन्हेगारीच्या मदतीने भारतात द्वेष पसरवण्यात गुंतला आहे. पाकिस्तानी लष्कराची प्रॉपेगेंडा विंग ISPR भारतात घडणाऱ्या कोणत्याही अपघाताची प्रसिद्धी करण्यास मागेपुढे पाहत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील अशांततेला प्रोत्साहन देणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करणे हा त्यांचा एकमेव मानस आहे. 

अधिक वाचा : गर्लफ्रेंडने नकली HR बनून बॉयफ्रेंडला शिकवला चांगलाच धडा  

असा आहे ISPR चा उद्देश

* भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा खराब करणे.
* जागतिक घडामोडींमध्ये भारताच्या मताला कमी महत्त्व मिळेल.
* भारतावर जागतिक दबाव वाढेल खासकरून अमेरिका आणि युरोपातील देशांना भारताला सल्ला देण्याचा दर्जा मिळेल.
* भारताची प्रतिमा खराब झाल्यास गुंतवणूक कमी होईल. 
* भारतातील पर्यटकांच्या संख्येत देखील घट होईल. 

रामनवमीच्या दिवशी दोन समुयांमध्ये झाला होता वाद

देशात अलीकडेच रामनवमीच्या दिवशी अशा घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये दोन समाजातील लोकांमध्ये खासकरून रामनवमी आणि रमजानच्या वेळी वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या वेळी सायबर क्राईम रे ॲनालिटिक्स अमित दुबेने देशातील अनेक राज्यांना सायबर प्रकरणांवर सल्ला देत असताना सोशल मीडिया आणि ट्विटरवर त्यांना एक असामान्य नमुना आढळून आला असल्याचे म्हटले. 

अधिक वाचा : मध्य रेल्वे मुख्य मार्ग वाहतूक रविवारच्या वेळापत्रकाने सुरू

पाकिस्तानमध्ये ट्रेंड झाले होते हॅशटॅग 

अमित दुबेने दिलेल्या माहितीनुसार, १० आणि ११ एप्रिलला ट्विटरवर तीन हॅशटॅग ट्रेंड झाले होते. या तीन्ही हॅशटॅग सोबत दोन दिवसांत तब्बल दिड लाख ट्विट करण्यात आली. यामधील ७० टक्के ट्विट ही विदेशातून करण्यात आली होतीत. लक्षणीय बाब म्हणजे सर्व ट्विटमधील ४० टक्के ट्विट पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून करण्यात आली. तसेच या ट्विटची सुरूवात पाकिस्तान मधून झाली होती. 

या हॅशटॅगचा समावेश 

#IndiaMuslimUnderAttack
#MuslimGenocidelnindia
#IndianMuslimGenocideAlert

या हॅशटॅगसह केल्या जाणाऱ्या ट्विटमध्ये भारतात घडलेल्या एका जुन्या घटनेचा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. अमेरिका, जर्मनी, कॅनडासह युरोपातील अनेक देशांतून या हॅशटॅगचा वापर करून ट्विटही केले जात होते. भारतातील अनेक लोक त्यांना रिट्विट करत होते, कारण कदाचित त्यांना असे वाटले असेल की सर्व ट्विट्स भारतातूनच केले जात आहेत. या संशोधनात असेही आढळून आले की, भारतातील सत्यापित खाते असलेल्या ज्यांनी या हॅशटॅगसह ट्विट रिट्विट केले होते किंवा त्यांचे मत दिले होते, त्यांनी नंतर हे ट्विट हटवले.

अधिक वाचा : लाऊडस्पीकरच्या वादावरून पीएफआयने राज ठाकरेंना धमकी

या देशांतून ट्विट करण्यात आले

पाकिस्तान - ४३०८१ (सर्वाधिक ट्विट)
अफगाणिस्तान - १६०४५
भारत - २९४२३
यूके - २३१
जर्मनी - ७८३
सौदी अरेबिया - १७३१ 
रोमानिया - ४८७ 
तुर्की - १४९७ 
इंडोनेशिया - ७५३४
मलेशिया - १३६७ 

एकूण किती लोकांनी हे ट्विट केले या बाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र १० आणि ११ एप्रिलच्या ट्विटच्या संदर्भानुसार एक व्यक्ती जवळपास ५० ट्विट करत असल्याचे म्हटले जाते. कॅनडाच्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते जगमीत सिंग यांनी भारतातील मुस्लिमांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जगमीत सिंग यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, मोदी सरकारने मुस्लिमविरोधी भावना पेटवणे थांबवावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी