Pakistan महिला पोलिसाने महिला कैद्याला निर्वस्त्र नाचवले

Pakistan lady police inspector forced woman detainee to dance naked in Balochistan province, dismissed from service बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटामध्ये महिला पोलीस निरीक्षकाने एका महिला कैद्याला निर्वस्त्र नाचवले.

Pakistan lady police inspector forced woman detainee to dance naked in Balochistan province, dismissed from service
Pakistan महिला पोलिसाने महिला कैद्याला निर्वस्त्र नाचवले 
थोडं पण कामाचं
  • Pakistan महिला पोलिसाने महिला कैद्याला निर्वस्त्र नाचवले
  • क्वेटामध्ये महिला पोलीस निरीक्षकाने एका महिला कैद्याला निर्वस्त्र नाचवले
  • महिला पोलिसाची सेवा समाप्त केली

Pakistan lady police inspector forced woman detainee to dance naked in Balochistan province, dismissed from service । क्वेटा: पाकिस्तानचे लष्कर (Pakistan Army) आणि पाकिस्तानचे पोलीस (Pakistan Police) देशातील सामान्यांचा किती छळ करतात याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटामध्ये महिला पोलीस निरीक्षकाने एका महिला कैद्याला निर्वस्त्र नाचवले. धक्कादायक म्हणजे इतर कैद्यांच्या समोर हा प्रकार झाला. ज्या महिला कैद्याला छळण्यात आले ती कच्चा कैदी या प्रकारातील कैदी होती. 

छळाची घटना उघड झाल्यावर अनेक मानवाधिकार संघटना आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांनी कारवाईसाठी सरकारवर दबाव टाकला. अखेर महिला कैद्याचा छळ करणाऱ्या महिला पोलीस निरीक्षकाचे निलंबन करण्यात आले. चौकशीत महिला पोलिसावरील आरोपांमध्ये तथ्य असल्याचे आढळले. यानंतर संबंधित महिला पोलिसाची सेवा समाप्त करण्यात आली. क्वेटाच्या पोलीस दलाचे उप महासंचालक मुहम्मद अजहर अकरम यांनी ही माहिती दिली.

ज्या महिला कैद्याचा छळ झाला तिच्यावर जिन्ना टाऊनशिप येथे मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात चौकशी सुरू असताना महिला पोलीस निरीक्षकाने संबंधित आरोपीला निर्वस्त्र नाचवले. ही घटना पोलीस कोठडीत घडली. यानंतर महिला कैद्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि कैद्याला निर्वस्त्र नाचवणाऱ्या महिला पोलीस निरीक्षकाची सेवा समाप्त करण्यात आली.

महिला कैद्याच्या चौकशीची जबाबदारी महिला पोलिसांकडे दिली जाते. पण अधिकाराचा गैरवापर करुन अमानवी छळ करण्याचा प्रकार पोलीस करणार असतील तर ते सहन केले जाणार नाही, असे क्वेटाच्या पोलीस दलाचे उप महासंचालक मुहम्मद अजहर अकरम म्हणाले. अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या महिला पोलीस निरीक्षकाची सेवा समाप्त केल्याचे क्वेटाच्या पोलीस दलाचे उप महासंचालक मुहम्मद अजहर अकरम यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी