तीन लग्न करणाऱ्या पाकिस्तानच्या खासदाराचा मृत्यू

Pakistan National Assembly Member Aamir Liaquat Hussain Was Found Dead In Karachi At His House : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाकडून खासदार म्हणून काम केलेले टीव्ही होस्ट आमिर लियाकत हुसेन यांचा मृत्यू झाला. ते ४९ वर्षांचे होते

Pakistan National Assembly Member Aamir Liaquat Hussain Was Found Dead In Karachi At His House
तीन लग्न करणाऱ्या पाकिस्तानच्या खासदाराचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • तीन लग्न करणाऱ्या पाकिस्तानच्या खासदाराचा मृत्यू
  • आमिर लियाकत हुसेन यांचा मृत्यू
  • ४९ वर्षांचे होते

Pakistan National Assembly Member Aamir Liaquat Hussain Was Found Dead In Karachi At His House : इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाकडून खासदार म्हणून काम केलेले टीव्ही होस्ट आमिर लियाकत हुसेन यांचा मृत्यू झाला. ते ४९ वर्षांचे होते. तीन लग्न केल्यामुळे ते चर्चेत होते. त्यांचे तिसरे लग्न आणि घटस्फोट यांची चर्चा पाकिस्तान तसेच पाकिस्तानच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर झाली. 

Pakistan: कराचीमध्ये हिंदू मंदिराची तोडफोड; पुजाऱ्याच्या घरावर हल्ला, मूर्तीची केली विटंबना

Power crisis in Pakistan : ऊर्जा बचतीसाठी रात्रीच्या लग्न समारंभाला बंदी, तर साडेआठ वाजेपासून बंद होणार मार्केट

शहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर आमिर लियाकत हुसेन पीटीआयमधून बाहेर पडले. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार ४९ वर्षांचे आमिर लियाकत हुसेन त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांना जवळच्या आगा खान विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याचे जाहीर केले. याआधी आदल्या रात्री आमिर लियाकत हुसेन यांना प्रचंड अस्वस्थ वाटत होते. बरे वाटत नसूनही ते हॉस्पिटलमध्ये दाखल होणे टाळत होते. सकाळी आमिर यांच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज आला. हा आवाज ऐकून घरातील नोकर जावेद याने आणखी काही जणांच्या मदतीने दरवाजा तोडला आणि खोलीत प्रवेश केला; अशी माहिती दिली.

आमिर लियाकत हुसेन टीव्ही होस्ट म्हणून लोकप्रिय होते. त्यांनी २०१८ मध्ये पीटीआयमध्ये प्रवेश केला आणि कराचीतील एका मतदारसंघातून निवडणूक जिंकून लोकप्रतिनिधी म्हणून पाकिस्तानच्या संसदेत प्रवेश केला. 

काही महिन्यांपूर्वी आमिर लियाकत हुसेन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला. या व्हिडीओत ते नग्नावस्थेत आइस ड्रग घेत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ कोणी रेकॉर्ड केला हे अद्याप जाहीर झालेले नाही. आमिर लियाकत हुसेन यांनी हा फेक व्हिडीओ आहे असे सांगितले. 

काही महिन्यांपूर्वी आमिर लियाकत हुसेन यांची तिसरी पत्नी दानिया हिने तलाक (घटस्फोट) मिळावा म्हणून कोर्टात अर्ज केला आहे. या अर्जाचा निकाल येण्याआधीच आमिर लियाकत हुसेन यांचा मृत्यू झाला. 

आमिर यांच्या मृत्यूचे वृत्त येताच पाकिस्तानच्या संसदेचे कामकाज तहकूब (स्थगित) करण्यात आले. माजी खासदार आमिर लियाकत हुसेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) होणार आहे. यातून मृत्यूचे कारण कळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी