पाकिस्तान आर्थिक संकटात! पंतप्रधान इमरान खाननं नाकारलं महागडं हॉटेल

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 08, 2019 | 14:56 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यावर मात करण्यासाठी पंतप्रधान इमरान खाननं आपल्या परदेशी दौऱ्यातील खर्चात कपात करण्यास सुरूवात केलीय. इमरान खान तीन दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Imaran Khan
अमेरिका दौऱ्यात इमरान खान राहणार राजदूत निवासस्थानी   |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानचे पंतप्रधान २१ जुलैपासून ३ दिवसीय अमेरिका दौऱ्यावर
  • खर्चात कपात करण्यासाठी हॉेटेलसोडून राजदूताच्या निवासस्थानी राहणार इम्रान खान
  • पंतप्रधान निवासस्थानातील १०० कार आणि ८ म्हशींचाही केला इम्रान खानने लिलाव

इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी सुरळीत करण्यासाठी प्रत्येक मार्गानं प्रयत्न करीत आहेत. यासाठी त्यांनी त्यांच्या खर्चालाही कात्री लावण्यास सुरूवात केलीय. पाकिस्तानचे पंतप्रधान २१ जुलैपासून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्यांच्या या भेटी दरम्यान आलिशान हॉटेल ऐवजी वॉशिंग्टनच्या देशाच्या राजदूतच्या अधिकृत निवासस्थानात राहण्याचा निर्णय घेतला आहे. राजदूत असद मजीद खान यांच्या निवासस्थानी राहण्यानं प्रवासाचा खर्च कमी होऊ शकतो. डॉन न्यूजच्या रिपोर्टनुसार इमरान खानच्या या निर्णयाबाबत अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं शहराच्या प्रशासनानंही कोणतीही गंभीर दखल घेतलेली नाही.

यूएस गुप्तचर विभाग अमेरिकेत येणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या सुरक्षिततेची जबाबदारी ते देशात राहणाऱ्या पर्यंत स्वीकारते. शहर प्रशासनाला देखील हे सुनिश्चित करावं लागतं की या दौऱ्यामुळे वॉशिंग्टनच्या वाहतुकीत व्यत्यय येऊ नये. वॉशिंग्टनमध्ये दरवर्षी शेकडो राष्ट्रपती आणि पंतप्रधान येतात आणि अमेरिका सरकार शहराच्या प्रशासनाच्या सहकार्यानं काम करतं आणि जे प्रतिष्ठित व्यक्ती देशात येतात त्यांच्यामुळं राजधानीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतात.

राजदूत निवास वॉशिंग्टनच्या डिप्लोमॅटीक एन्क्लेव्हच्या मध्यभागी आहे. या क्षेत्रात भारतासह, जपान, तुर्कीसह डझनभर दूतावास आहेत. डॉनच्या अहवालानुसार, अमेरिकेत येणारे इतर देशांचे मुख्य अतिथी वॉशिंग्टन प्रवासामध्ये अमेरिकेच्या अनेक अधिकारी, खासदार, मीडिया आणि थिंक टॅंकच्या प्रतिनिधींना भेट देत आहेत.

या सर्व बैठकींसाठी मोठी जागा नसल्यामुळे इमरान खानला त्यांच्या पाहुण्यांना पाकिस्तान दूतावासाला भेटावं लागेल. कारण पिक अव्हरमध्ये वॉशिंग्टनचं ट्रॅफिक व्यस्त असतं. आता या बैठकांच्या नियोजनासाठी इमरान खान यांच्या टीमला अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्या अधिकृत निवासस्थानासह इतर दूतावासांकडे देखील जावं लागेल.

पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटांचा सामना करत आहे. पाकिस्तानला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सत्ता हाती येताच सरकारी खर्चांना कात्री लावणार या आणि अशा अनेक मोठ्या घोषणा इमरान खान यांनी केल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी सरकारी लक्झरी वाहनांची निलामी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पीएम निवासस्थानातील १०० पेक्षा जास्त लक्झरी कारची निलामी केली होती. यात बुलेटप्रुफ वाहनांचाही समावेश होता. लिलावातून कोट्यवधी रूपये कमावले. इमरान खाननं देशावर असलेल्या मोठ्या कर्जाची भरपाई करण्यासाठी अशाप्रकारची पावलं उचलली होती.

एवढंच नव्हे तर त्यांनी पंतप्रधान निवासस्थानाच्या आठ म्हशींची निलामीही केली होती. यामुळे सरकारच्या तिजोरीत 23 लाख रूपये आले होते. या म्हशींना माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाळले होते. यातील एका म्हशीसाठी सर्वाधिक ३ लाख ८५ हजार रूपये इतकी बोली लागली होती. पाक सरकारनं निलामीसाठी चार हेलिकॉप्टरही ठेवले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी