चीनच्या नेव्हीसोबत दिसली अणूहल्ला करणारी पाकिस्तानची पानबुडी, भारताला घेरण्याचा प्रयत्न

Pakistani Submarine with Chinese Navy: पाकिस्तानच्या नौसेनेनं नुकतीच आपली एक पानबुडी चीनच्या युद्धनौकांसोबत कराचीमध्ये तैनात केली होती. नुकत्याच घेतलेल्या सॅटेलाईट फोटोंमधून हा खुलासा झालाय. जाणून घ्या याबाबत..

Submarine (Representative Image)
चीनच्या नेव्हीसोबत दिसली अणूहल्ला करणारी पाकिस्तानची पानबुडी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • चीनच्या युद्धनौकांसोबत दिसली पाकिस्तानची अणूहल्ला करू शकणारी पानबुडी.
  • चीनच्या युआन क्लासच्या ८ पानबुड्या खरेदी करत आहे पाकिस्तान, पाण्याच्या आता शोधणं कठीण
  • भारताविरोधात चीन आणि पाकिस्तानच्या नेव्हीची मैत्री वाढली, अरबी समुद्रात वाढू शकतो तणाव

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या नौसेनेनं (Pakistan Navy) नुकतीच आपली एक पानबुडी (Submarine) चीनच्या युद्धनौकांसोबत (Chinese Warships)  कराचीमध्ये तैनात केली होती. नुकत्याच समोर आलेल्या काही सॅटेलाईट फोटोंमधून हा खुलासा झाला आहे की, चीनच्या युद्धनौकांच्या रक्षणासाठी पाकिस्ताननं आपली अगोस्टा-१९ बी टाईपची डिझेल इलेक्ट्रिक अटॅक पानबुडी तैनात केली होती. फ्रान्स बनावटीची ही पानबुडी न्यूक्लिअर मिसाईल बाबर-३ लॉन्च करण्यासाठी सक्षम आहे. पाकिस्तान आणि चीन नौसेनेचं हे एकत्र येणं भारताची काळजी वाढवू शकतं.

पाकिस्तान आणि मलेशियन नेव्हीमध्ये सामिल आहेत या पानबुड्या

यापूर्वी असा दावा केला जात होता की, चीनच्या युद्धनौकांसोबत त्यांची पानबुडी पण पाकिस्तानच्या कराची बंदरात पोहोचली आहे. मात्र आता आलेल्या सॅटेलाईट इमेजद्वारे हे स्पष्ट झालंय की, चीनच्या युद्धनौकांचं रक्षण करण्यासाठी पाकिस्ताननं आपली अटॅक पानबुडी तैनात केली होती. अगोस्टा-१९ बी टाईपची डिझेल पानबुडी तैनात केली होती. अगोस्टा-१९ बी टाईपची डिझेल इलेक्ट्रिक पानबुडी आशियामध्ये फक्त पाकिस्तान आणि मलेशियाकडे आहे.

चीनकडून ८ पानबुड्या खरेदी करत आहे पाकिस्तान

फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान नौसेनेनं आपली शक्ती वाढविण्यासाठी चीन डिझाईनवर आधारलेल्या टाईप ०३९ बी युआन क्लासची पानबुडी खरेदी करत आहे. डीझेल इलेक्ट्रिक चीनची ही पानबुडी पाकिस्तानच्या नौसेनेची शक्ती वाढविण्यासाठी सक्षम आहे. ज्यात अँटी शिप क्रूझ मिसाईल लागलेलं आहे. ही पानबुडी एअर इंडिपेंडेंट प्रपल्शन सिस्टममुळे कमी आवाज निर्माण होतो. ज्यात ते पाण्याखाली आहे, हे शोधून काढणं खूप कठीण होतं.

अणू हल्ला करण्यासाठी सक्षम आहे अगोस्टा क्लासची पानबुडी

पाकिस्तान फ्रान्स बनावटीच्या अगोस्टा-१९ बी टाईपच्या पाच पानबुड्या वापरतात. यातील तीन-तीन एअर इंडिपेंडेंट पॉवरसोबत अपग्रेड केल्या गेल्या आहेत. हा पानबुड्या पाकिस्तानी नौसेनेच्या के के शस्त्रागारांपैकी सर्वाधिक शक्तीशाली आणि आधुनिक आहे. या पानबुड्यांना आधुनिक लढाई सिस्टम आणि AS-39 एक्सोसेट अँटी-शिप मिसाईल युक्त आहे. याशिवाय या क्लासच्या पानबुड्या न्यूक्लिअर मिसाईल बाबर-३ लॉन्च करण्यासाठी सक्षम आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी