Karachi Blast : इस्लामाबाद : पाकिस्तानात मंगळवारी एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट म्हणजे आत्मघातकी हल्ला होता असे सांगण्यात येत आहे. कराची विद्यापीठात कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूट बाहेर एका गाडीत हा स्फोट झाला. या स्फोटात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी तीन जण हे चीनचे नागरिक आहेत. पाकिस्तानी वृत्तवाहिनी जियो न्युजने ही माहिती दिली आहे. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
#BREAKING: Video of suicide attack on Chinese national’s vehicle in #Karachi university. pic.twitter.com/6Ppr45rUOb
— Asad Ali Toor (@AsadAToor) April 26, 2022
द न्युज या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार एका गाडीत चार चीनचे प्राध्यापक विद्यापीठात कन्फ्यूशियस विभागात जात होते. तेव्हा हा स्फोट झाला. या प्राध्यपकांच्या सुरक्षेसाठी दोन जवानही तैनात होते आणि ते त्यांच्या गाडीसोबत बाईकवरून येत होते. कराची पोलीस प्रमुख नबी मेमन म्हणाले की हा आत्मघातकी हल्ला असू शकतो. एका बुरखा घातलेल्या महिलेने हा स्फोट केला असावा असेही मेमन म्हणाले.
#BREAKING: 4 Chinese national died in a blast in a vehicle inside Karachi university. pic.twitter.com/7XCBRLRAwO
— Asad Ali Toor (@AsadAToor) April 26, 2022
डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोण जण जखमी झाले आहेत. सिंध मुखमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुआर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. मृतांमध्ये तीन चीनच्या नागरिकांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटली असून त्यात कन्फ्यूशियस विभागाचे संचालक हुआंग गुइपिंग, डिंग मुपेंग, चेन सा आणि चालक खालिद यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये एक चीनच्या नागरिकाचाही समावेश आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात सैन्याचे चार अधिकारी जखमी झाले आहेत. हे अधिकारी चीनच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. सध्या सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉक्टरांनी म्हटले आहे.