Pakistani Owns land in India | या गावात पाकिस्तानीच आहेत करोडोंच्या जमिनीचे मालक! सातबाऱ्यावरही पाकिस्तान्यांचे नाव...पाहा काय आहे प्रकरण

Village in Uttar Pradesh : भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) वेगळे होऊन 75 वर्षे झाली आहेत. या दोन्ही देशांमधील शत्रुत्व सर्व जगात माहिती आहे. दोन्ही देशांमध्ये सतत कुरबुरी सुरू असतात. मात्र जर पाकिस्तानी लोकांच्या मालकीच्या जमिनी आजही भारतातील गावात आहेत असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला काय वाटेल. आश्चर्याचा धक्काच बसेल ना. परंतु खरोखरंच असे असल्याची माहिती समोर येते आहे.

Lands of Pakistani Citizens in India
भारतातील गावात आहेत पाकिस्तान्यांच्या करोडोंच्या जमिनी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) वेगळे होऊन 75 वर्षे झाली
  • स्वातंत्र्याच्या वेळी देश सोडून पाकिस्तानात गेलेल्या लोकांच्या जमिनी अजूनही भारतात
  • या गावातील जमिनीच्या नोंदींमध्ये अनेक पाकिस्तानी लोकांची नावे आहेत.

Lands of Pakistani Citizens: नवी दिल्ली : भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) वेगळे होऊन 75 वर्षे झाली आहेत. या दोन्ही देशांमधील शत्रुत्व सर्व जगात माहिती आहे. दोन्ही देशांमध्ये सतत कुरबुरी सुरू असतात. मात्र जर पाकिस्तानी लोकांच्या मालकीच्या जमिनी आजही भारतातील गावात आहेत असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला काय वाटेल. आश्चर्याचा धक्काच बसेल ना. परंतु खरोखरंच असे असल्याची माहिती समोर येते आहे. एरवी पाकिस्तानचे नाव काढल्यावर भारतीयांच्या डोळ्यासमोर शत्रू राष्ट्राचीच कल्पना येते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, स्वातंत्र्याच्या वेळी देश सोडून पाकिस्तानात गेलेल्या लोकांच्या जमिनी अजूनही भारतात (Lands of Pakistani Citizens in India)आहे. इतकंच नाही तर इथल्या जमिनीच्या सातबाराच्या उताऱ्यावरदेखील पाकिस्तानींची नावेही नोंदवली जातात, त्याचप्रमाणे देशाचं नावही पाकिस्तान असं लिहिलं जातं. तुम्ही विचार करत असाल की हे कसे शक्य आहे? आता अधिकारी या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. (Pakistani citizens owns lands in India on documents, check the surprising details)

अधिक वाचा : Indian Railways: रेल्वेने दिली खुशखबर! उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रेनमध्ये मिळणार कन्फर्म सीट 

उत्तर प्रदेशातील गाव

कानपूर ग्रामीण भागातील अकबरपूरचे हे प्रकरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कानपूर ग्रामीण भागातील अकबरपूर तहसीलमधील बारा गावांचे आहे. या गावातील जमिनीच्या नोंदींमध्ये अनेक पाकिस्तानी लोकांची नावे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता तहसील प्रशासन पाकिस्तान्यांच्या नावावर नोंदवलेल्या जमिनींचा तपशील तयार करत आहे. यानंतर शत्रू मालमत्तेअंतर्गत कारवाई केली जाईल.

अधिक वाचा : पंजाबमध्ये पतियाळात हिंसा, शिवसेनेच्या हरिश सिंगलाला अटक

स्थानिकांनी केला जमिनीवर कब्जा

स्वातंत्र्यानंतर देशाच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर या गावातील काही लोक पाकिस्तानात निघून गेले. त्यांच्या जमिनी आजही येथे आहेत. या जमिनी अनेक वर्षे रिकाम्या राहिल्या, मात्र लोकसंख्या वाढल्याने काही लोकांनी त्यावर कब्जा करण्यास सुरुवात केली. ज्यांच्या नावावर या जमिनी आहेत ते लोक हयात आहेत की नाही, याचीही माहिती नाही. जमिनीच्या प्रकरणात आजपर्यंत कोणाचीही तक्रार नाही.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आश्वासन 

कानपूर ग्रामीणच्या जिल्हा दंडाधिकारी नेहा जैन यांनी सांगितले की, अशा प्रकरणाची कोणतीही माहिती नाही. अशा जमिनींची पाहणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. या जमिनींची तपासणी केल्यानंतर त्याची माहितीही शासनस्तरावर दिली जाणार आहे. आता शत्रू मालमत्ता नियमानुसार कारवाई केली जाईल.

अधिक वाचा : Food Crisis : अरे देवा! पैसा राहूनही नाही मिळणार अन्न; अवघ्या 27 वर्षात जगावर येणार अन्न संकट, एका भाकरीसाठी होईल पळापळ

फाळणीच्या वेळेस जेव्हा भारतातून लोक पाकिस्तानात गेले आणि पाकिस्तानातून भारतात आले तेव्हा ते आपली सर्व मालमत्ता, घरंदारे, जमिनी, इतर मालमत्ता तिथेच सोडून जे हाती येईल ते घेऊन निघून गेले होते. त्यावेळची परिस्थितीच अशी होती की त्यांना या सर्व गोष्टींची विल्हेवाट लावण्याची संधीच मिळाली नाही. त्यांच्याकडे तेव्हा वेळच नव्हता. लाखो लोक अचानक रस्त्यावर आले होते. अशा परिस्थितीत जे लोक आपल्या शेतजमिनी किंवा इतर जमिनी सोडून गेले त्यांच्या जमिनीवर त्या त्या देशातील स्थानिकांनी कालांतराने कब्जा केला किंवा तेथील प्रशासनाने तरी त्या ताब्यात घेतल्या. काही ठिकाणी कागदोपत्री मालकी हक्काचाही प्रश्न निर्माण झाला. मात्र अनेक वर्षात यासंदर्भातील मुद्दे निकाली निघत स्थानिक पातळीवर मालकी हक्क दिले गेले आहेत किंवा प्रशासनाने त्या ताब्यात घेतल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी