नवी दिल्ली: पाकिस्तानसोबतच्या (Pakistan) आंतरराष्ट्रीय सीमा रेषेजवळ (Border) बांधलेल्या भारतीय चौक्यांवर (Indian posts) हल्ला करण्याच्या प्रयत्नांबाबत भारतीय लष्कराने (Indian Army) मोठा खुलासा केला आहे. भारतीय चौकीवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानच्या (Pakistan) एका कर्नलने (Colonel) दहशतवाद्यांना 30 हजार रुपये दिले होते. हा खुलासा एका अटक केलेल्या दहशतवाद्याने लष्कराला केला. याची माहिती लष्कराने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
21 ऑगस्ट रोजी राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला होता. नौशेरा भागातील झांगर सेक्टरमध्ये तैनात असलेल्या सैनिकांनी नियंत्रण रेषेवर दोन ते तीन दहशतवाद्यांच्या हालचाली पाहिल्या. एक दहशतवादी भारतीय चौकीजवळ होता आणि कुंपण कापण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा भारतीय सैन्याला याची माहिती झाली सैन्याकडून कारवाई होणार असल्याचे कळताच या दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारतीय लष्कराने त्यांच्यावर गोळीबार केला यात एक दहशतवादी जखमी झाला त्यानंतर त्याला पकडण्यात आले.
Read Also : वर्षभरात 75 हजार शासकीय रिक्त पदांची भरती
आणखी दोन दहशतवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पाकिस्तानच्या ताब्यातील भागात पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. दरम्यान जखमी झालेल्या दहशतवाद्याला अटक करून त्याला तात्काळ वैद्यकीय मदत दिली. इतकेच नाहीतर त्याला वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. या दहशतवाद्याचे नाव तबरक हुसेन असे आहे.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Read Also : गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात उंदीर दिसला तर शुभ असतं का अशुभ
तबरक यांनी पाकिस्तानी लष्कराबाबत दिलेल्या माहितीनुसार, बंद खोलीतील पाकिस्तानी सैन्याचे शब्द शांतता प्रस्थापित करण्याबाबत आहेत. पण जमिनीवरचे त्याचे प्रयत्न वेगळ्याच रूपात दिसतात. दरम्यान, अटकेत असलेला दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली जिल्ह्यातील सब्जकोर्ट गावचा रहिवासी आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान दहशतवाद्याने सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या कर्नल युनूस चौधरीने त्याला भारतीय सीमेत घुसण्यासाठी पाठवले होते.
पाकव्याप्त काश्मीरमधील रहिवासी असलेल्या तबराकच्या म्हणण्यानुसार, त्याने पाकिस्तानी लष्करातील कर्नल युनूसच्या सांगण्यावरून पाच जणांसह घुसखोरीचा प्रयत्न केला होता. घुसखोरीसाठी 30 हजार रुपयेही मिळाले असल्याचे त्याने सांगितले. किती भारतीय पोस्ट्स रेकी केली असे विचारले असता, दहशतवादी म्हणाला की, ते किमान दोन ते तीन पोस्टची रेकी करण्यात यशस्वी झाले होते.
तबरक यांनी सांगितले की, सामान्य लोकांना भारतीय सीमेत घुसण्यास प्रवृत्त केले जाते, ब्रेन वॉश आणि पैशाचे आमिष दाखवले जाते.
Read Also : सुजित पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल
जे घुसखोरी करण्यास तयार होत नाहीत त्यांना पाकिस्तानी सैन्याकडून वाईट वागणूक मिळत असते. या दहशतवाद्याकडे जे त्याला या कर्नलने दिली होती. लष्कराच्या म्हणण्यानुसार, तबराक हुसेन हा त्या पथकाचा भाग होता ज्याने भारतीय अग्रिम पोस्टची रेकी केली होती. या दहशतवाद्याला 21 ऑगस्ट रोजी 'प्रवेश करण्यास' सांगण्यात आले होते. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तीला त्याचा भाऊ हारुन अलीसह 2016 मध्ये याच सेक्टरमध्ये अटक करण्यात आली होती आणि नोव्हेंबर 2017 मध्ये मानवतावादी आधारावर सीमेपलीकडे सोडण्यात आले होते.