Pakistan Shameless Act : पाकिस्तानी रेस्टॉरंटचा निर्लज्जपणा, गंगूबाई सिनेमातील सीन प्रमोशनसाठी वापरत दाखवून दिली पातळी

पाकिस्तानमधील एका रेस्टॉरंटनं निर्लज्जपणाचा कळस केला आहे. आपल्या प्रमोशनसाठी या रेस्टॉरंटनं गंगूबाई चित्रपटातील संवेदनशील दृश्याचा वापर केला आहे.

Pakistan Shameless Act
पाकिस्तानी रेस्टॉरंटचा निर्लज्जपणा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रेस्टॉरंटनं वापरला 'गंगूबाई' सिनेमातील प्रसंग
  • हॉेटेलचं प्रमोशन करण्यासाठी निर्लज्जपणाचा कळस
  • सोशल मीडियावरून होतेय जोरदार टीका

Pakistan Shameless Act | पाकिस्तानमधील एका हॉटेलने केलेल्या निर्लज्जपणाची सध्या पाकिस्तान आणि भारतासोबत पूर्ण जगभर चर्चा सुरू आहे. भारतात काही महिन्यांपूर्वी हिट झालेल्या गंगूबाई काठियावाड या सिनेमातील एक सीन आपल्या प्रमोशनसाठी वापरून या रेस्टॉरंटने असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. चित्रपटात ज्या भावनेनं अलिया भट्टवर एक सीन चित्रित करण्यात आला आहे, ती भावना आणि त्याामागील वेदना समजून न घेता या रेस्टॉरंटनं गल्लाभरू पद्धतीनं आपला व्यवसाय वाढवण्यासाठी या दृश्याचा वापर केल्याचं पाहून भारतातीलच नव्हे तर पाकिस्तानातीलही नागरिक संतापले आहेत. 

हा सीन वापरला

गंगूबाई काठियावाड चित्रपटात अभिनेत्री अलिया भट्टने गंगूबाईची भूमिका साकारली आहे. गंगूबाई जेव्हा वेश्या व्यवसायात ढकलली जाते आणि आपलं प्राक्तन स्विकारून या व्यवसायासाठी उभी राहते, तो प्रसंग साकारणारा हा सीन आहे. गंगूबाई वेश्याव्यवसायासाठी नटून थटून खोलीच्या बाहेर उभी राहते आणि समोरून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांकडे पाहून त्यांना ‘शुक शुक’ करून हाक मारते, असं या सीनमध्ये दिसतं. सर्वसामान्य आणि सुखी कुटुंबातून या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या महिलेची मनोवस्था काय होत असेल, याची कल्पना हा प्रसंग पाहताना येते. हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाच्या काळजात यावेळी गलबलून येतं आणि ही वेळ कुणावरही येऊ नये, असं मनोमन वाटत राहतं. मात्र पाकिस्तानातल्या एका रेस्टॉरंटनं हाच सीन आपल्या रेस्टॉरंटमध्ये गिऱ्हाइकांना बोलावण्यासाठी वापरला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Swing 🌸 (@swing.khi)

असा वापरला सीन

अलिया भट दारात उभी राहून गिऱ्हाइकांना ‘शुक शुक’ करून बोलावत असल्याचं दाखवणारा सीन वापरून पाकिस्तानातील हॉटेलनं आपल्याकडे गिऱ्हाईकांना बोलावण्याचा प्रयत्न केला आहे. पुरुषांना ऑफर देण्यासाठी या सीनचा वापर करण्यात आला आहे. रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या पुरुषांना हॉटेलकडून 25 टक्के सवलत या जाहीर करण्यात आली आहे. 

अधिक वाचा - Agnipath Railway Damage : ‘अग्निपथ’विरोधातील आंदोलनात जाळल्या रेल्वे, एका डब्याची किंमत असते कोट्यवधी रुपये, वाचा सविस्तर

व्हिडिओवर टीका

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट कऱण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून त्यावर जगभरातून टीकेची झोड उठली आहे. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अशा प्रकारे संवेदनशील दृष्यांचा वापर करणं हे निंदनीय असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. या रेस्टॉरंटनं ही जाहीरात तातडीनं मागे घ्यावी आणि पुन्हा कधीही त्याचा वापर करू नये, असा सल्ला अनेकजण देत आहेत. जर वेश्यांचं दुःख समजत नसेल, तर निदान त्यांच्या भावनांशी तरी खेळू नये, अशी अपेक्षा युजर्स व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी