पाकिस्तानची महिला भारतीयाशी लग्न करण्यासाठी जालंधरमध्ये दाखल

Pakistani woman all set to marry Indian man; arrives with family in Jalandhar : पाकिस्तानमध्ये लाहोर येथे राहणारी शुमैला लवकरच भारतात जालंधर येथे राहणाऱ्या कमल कल्याण सोबत लग्न करणार आहे.

Pakistani woman all set to marry Indian man; arrives with family in Jalandhar
पाकिस्तानची महिला भारतीयाशी लग्न करण्यासाठी जालंधरमध्ये दाखल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानची महिला भारतीयाशी लग्न करण्यासाठी जालंधरमध्ये दाखल
  • शुमैला आणि कल्याण यांचा साखपुडा २०१८ मध्ये झाला
  • लग्नानंतर शुमैला आणि कल्याण हे दांपत्य जालंधरमध्येच संसार सुरू करणार

Pakistani woman all set to marry Indian man; arrives with family in Jalandhar : पाकिस्तानमध्ये लाहोर येथे राहणारी शुमैला (Shumaila) लवकरच भारतात जालंधर येथे राहणाऱ्या कमल कल्याण (Kamal Kalyan) सोबत लग्न करणार आहे. या लग्नानंतर शुमैला आणि कल्याण हे दांपत्य जालंधरमध्येच संसार सुरू करणार आहे. लग्नासाठी शुमैला तिच्या माहेरच्यांसोबत वाघा बॉर्डर पार करून अटारी येथे भारताच्या हद्दीत आली. तिथून पुढे जालंधरमध्ये दाखल झाली. । भारत

कल्याण यांचा जालंधर येथे कार विक्रीचा व्यवसाय आहे. कल्याण आणि शुमैला यांचे लग्न घरातील मोठ्या माणसांनी काही वर्षांपूर्वीच ठरवले होते. शुमैला लग्नाच्या वयाची झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे हे लग्न होत आहे. 

शुमैला आणि कल्याण यांचा साखपुडा २०१८ मध्ये झाला होता. पण कोरोना संकट तसेच लग्नाला उपस्थित राहणार असलेल्या सर्वांचे व्हिसा आणि पासपोर्ट या संदर्भातल्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्यात बराच वेळ गेला. यामुळे लग्न आता २०२२ मध्ये म्हणजेच यंदाच्या वर्षी होत आहे. 

लग्नासाठी शुमैला आणि तिचे पाकिस्तानमधील कुटुंब तसेच तिथले जवळचे नातलग पाकिस्तानमधून भारतात आले. या मंडळींना प्रामुख्याने शुमैलाला ओळखणारी अनेक मंडळी वाघा बॉर्डर येथे मोठ्या संख्येने उपस्थित होती. अटारी येथे भारतात प्रवेश करताच शुमैला आणि तिच्या नातलगांचे कल्याण तसेच त्याच्या नातलगांनी जोरदार स्वागत केले. यानंतर सर्वजण जालंधरला आले. आता जालंधर येथे लग्न होणार आहे; असे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या स्थानिक प्रतिनिधीने दिले आहे.

व्हिडीओ कॉलद्वारे संपर्कात

साखरपुडा झाल्यापासून शुमैला आणि कमल कल्याण हे दोघे नियमितपणे एकमेकांच्य संपर्कात होते. व्हिडीओ कॉल करून ते एकमेकांच्या संपर्कात होते. यामुळे शुमैला आणि कमल कल्याण हे दोघेही एकमेकांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना ओळखू लागले आहेत. यामुळेच लग्नासाठी पाकिस्तानमधून भारतात येऊनही शुमैलाला तिच्या कुटुंबातील सदस्यांसोबतच आहोत, असे वाटत आहेत. अर्थात लग्नानंतर पाकिस्तानमधील काही गोष्टी फक्त आठवणीत राहतील याचा तिला जाणीव आहे. पण असा प्रकार कमी-जास्त प्रमाणात प्रत्येकीच्या बाबत होतो त्यामुळे त्याचा त्रास करून घ्यायचा नाही, असा ठाम निश्चय शुमैलाने केला आहे. कमल कल्याण सोबत लग्न करून सुखी होईन, घरच्यांनी नीट विचार करूनच हे लग्न ठरवले असणार; असा विश्वास शुमैलाने व्यक्त केला, 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी