UAE Double Murder Case : भारतीय दांपत्याच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानी नागरिकाला फाशी

Pakistani Worker Sentenced To Death For Killing Indian Couple In UAE : यूएईमध्ये (United Arab Emirates - UAE) वास्तव्यास असलेल्या भारतीय दांपत्याच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानी नागरिकाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 

Pakistani Worker Sentenced To Death For Killing Indian Couple In UAE
भारतीय दांपत्याच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानी नागरिकाला फाशी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतीय दांपत्याच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानी नागरिकाला फाशी
  • यूएईमधील घटना
  • कोर्टाने साक्षी पुराव्यांच्या आधारे पाकिस्तानच्या नागरिकाला ठरविले दोषी

Pakistani Worker Sentenced To Death For Killing Indian Couple In UAE : दुबई : यूएईमध्ये (United Arab Emirates - UAE) वास्तव्यास असलेल्या भारतीय दांपत्याच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानी नागरिकाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 

हिरेन अधिया त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत यूएईमध्ये एका व्हिलामध्ये वास्तव्यास होते. घराच्या साफसफाईसाठी त्यांनी एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मर्यादीत कालावधीसाठी घरी बोलावले होते. कंपनीकडून कामासाठी आलेल्यांमध्ये एक पाकिस्तानचा नागरिक होता. कामाच्या निमित्ताने घरातली संपत्ती पाहून पाकिस्तानचा नागरिक असलेल्या व्यक्तीने दरोडा टाकण्याची योजना तयार केली. काम संपल्यावर पाकिस्तानचा नागरिक असलेल्या व्यक्तीने शारजा सुपर मार्केटमधून धारदार चाकू विकत घेतला. एका कॅब ड्रायव्हरला ७० दिऱ्हाम देऊन (सुमारे १५०० रुपये) रात्री पाकिस्तानचा नागरिक गुपचूप व्हिला जवळ आला. त्याने संरक्षक भिंत ओलांडून व्हिलाच्या परिसरात प्रवेश केला. पायातील चपला काढून पाकिस्तानचा नागरिक भिंतीवरील पाइपचा आधार घेऊन व्हिलाच्या पहिल्या मजल्यावर आला. तिथून त्याने घरात प्रवेश केला. त्याने घरातील एका कपाटातील पर्समधून १९६५ दिऱ्हाम (सुमारे ४० हजार रुपये) लुटले. 

पाकिस्तानचा नागरिक आणखी लुटालूट करणार तोच घर मालक हिरेन अधिया जागे  झाले. हिरेन यांना पाहून पाकिस्तानच्या नागरिक असलेल्या व्यक्तीने चाकूने हल्ला केला. तब्बल दहा वेळा पाकिस्तानच्या नागरिकाने हिरेन यांच्या पोटात चाकू खुपसला. हल्लेखोराला अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिरेन यांच्या पत्नीवरही पाकिस्तानच्या नागरिकाने चाकूने हल्ला केला. तब्बल चौदावेळा हिरेन यांच्या पत्नीवर हल्लेखोराने चाकूने घातक वार केले. चाकू हल्ल्यात हिरेन अधिया आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. 

आई वडिलांचे आवाज ऐकून त्यांच्या खोलीत आलेल्या मुलीवर पाकिस्तानच्या नागरिकाने चाकूने एक वार केला. हा वार मानेवरून झाला. पण वार जोरात झाला नाही, त्यामुळे वाचलेली मुलगी वेगाने स्वतःच्या खोलीत गेली. तिने दार आतून लावून घेतले आणि लगेच पोलिसांना फोन केला.

पोलीस येण्याआधी चाकू आणि हातात असलेले पैसे घेऊन पाकिस्तानच्या नागरिकाने घरातून पळ काढला.  या गडबडीत व्हिलाजवळ ठेवलेल्या चपला घ्यायला तो विसरला. काही काळ दुबई-अल-एन रोड वर अनवाणी चालल्यावर त्याने चाकू जवळच्या रेतीच्या ढिगाऱ्यात लपविला. नंतर हल्लेखोराने त्याच कॅब ड्रायव्हरला फोन केला ज्याने काही वेळापूर्वी त्याला व्हिलाजवळ सोडले होते. कॅबमधून हल्लेखोर पळून गेला.

पोलिसांनी दुहेरी हत्येप्रकरणी तपास करून पाकिस्तानच्या नागरिकाला अटक केली आणि त्याच्या विरोधात कोर्ट केस चालविली. कोर्टाने साक्षी पुराव्यांच्या आधारे पाकिस्तानच्या नागरिकाला दोन हत्या आणि चोरीसाठी दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी