BSF ने पुन्हा एकदा उधळले पाकिस्तानचे मनसुबे , 'मेड इन चायना' ड्रोन घुसले भारताच्या हद्दीत

Pakistan's drone enters Indian border :सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शुक्रवारी रात्री पंजाबमधील फिरोजपूर भागात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानचे ड्रोन पाडले.

 Pakistan's 'Made in China' drone enters Indian border, downed by BSF near Ferozepur border
BSF ने पुन्हा एकदा उधळले पाकिस्तानचे मनसुबे , 'मेड इन चायना' ड्रोन घुसले भारताच्या हद्दीत ।  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानचे 'मेड इन चायना' ड्रोन पंजाबच्या फिरोजपूर सीमेजवळ दिसले
  • बीएसएफच्या जवानांनी पाडून घेतलं ताब्यात
  • बीएसएफ जवानांनी पुन्हा एकदा सीमेपलीकडील गुन्हेगारांचे मनसुबे उधळून लावले.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय सीमेजवळील पंजाबमधील फिरोजपूर भागात शुक्रवारी रात्री कमी उंचीवर उडणारे पाकिस्तानी हेक्साकॉप्टर (ड्रोन) आढळून आले. ते सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाडून ताब्यात घेतले. बीएसएफच्या म्हणण्यानुसार, हे ड्रोन चीनमध्ये बनले असून ते पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसले आहेत. (Pakistan's 'Made in China' drone enters Indian border, downed by BSF near Ferozepur border)

पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसले

बीएसएफच्या म्हणण्यानुसार, हे ड्रोन मेड इन चायना म्हणजेच चीनचे होते आणि पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसले होते. माहिती मिळताच बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

ड्रोन कमी उंचीवर उडताना दिसला

बीएसएफने सांगितले की, अमरकोटमधील सीमा चौकीवर गस्त घालणाऱ्या एका पथकाला रात्री ११.१० च्या सुमारास गुंजारवाचा आवाज आला. यानंतर हेक्साकॉप्टर ड्रोन कमी उंचीवर उडताना दिसला. हे ड्रोन आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 300 मीटर आणि बाडा सीमेपासून 150 मीटर अंतरावर होते. त्यानंतर तो बीएसएफने ताब्यात घेतला.

शस्त्रे नेण्यासाठी ड्रोनचा वापर

बीएसएफने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “17 डिसेंबर रोजी रात्री 11:10 वाजता, बॉर्डर आउट पोस्टच्या सतर्क कर्मचार्‍यांनी अमरकोट येथे ड्रोन शोधून ते पाडले. हे ड्रोन सीमा सुरक्षा चौकापासून सुमारे 150 मीटर आणि आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 300 मीटर अंतरावर होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून शोधमोहीम सुरू केली आहे. जप्त केलेले ड्रोन मेड इन चायना आहे. दक्ष बीएसएफ जवानांनी पुन्हा एकदा सीमेपलीकडील गुन्हेगारांचे मनसुबे उधळून लावले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, बीएसएफ शोध मोहिमेद्वारे सीमेपलीकडून मादक पदार्थ किंवा शस्त्रे नेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणातील अधिक तपशीलाची सध्या प्रतीक्षा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी