पाकिस्तानचा कट फसला; भारतीय तटरक्षक दलाने बोटीतून जप्त केलं 280 कोटींचे हेरॉईन

भारताने (India) पाकिस्तानचा (Pakistan) एक मोठा कट उधळून लावला आहे. भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat Anti-Terrorism Squad) राज्याच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात (Arabian Sea) नऊ क्रू सदस्यांसह एक पाकिस्तानी बोट पकडली आहे. या बोटीतून 280 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले

ndian Coast Guard seizes heroin worth Rs 280 crore  (File Photo)
भारतीय तटरक्षक दलाने बोटीतून जप्त केलं 280 कोटींचे हेरॉईन   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंजाबच्या अटारी सीमेवर 'मुलेठी'च्या मालामध्ये लपवून ठेवलेले 100 किलोहून अधिक हेरॉईन जप्त
  • तटरक्षक दलाच्या जहाजांनी 'अल हज' नावाची पाकिस्तानी बोट पकडली

Indian Coast Guard: अहमदाबाद : भारताने (India) पाकिस्तानचा (Pakistan) एक मोठा कट उधळून लावला आहे. भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat Anti-Terrorism Squad) राज्याच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात (Arabian Sea) नऊ क्रू सदस्यांसह एक पाकिस्तानी बोट पकडली आहे. या बोटीतून 280 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले असून याविषयी माहिती संरक्षण प्रवक्त्याने सोमवारी दिली.

प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, तटरक्षक दलाच्या जहाजांनी 'अल हज' नावाची पाकिस्तानी बोट भारतीय पाण्यात घुसल्यावर तिला चेतावणी दिली आणि पकडले. अधिकाऱ्यांना बोटीवर 280 कोटी रुपयांचे हेरॉईन सापडले. पुढील तपासासाठी बोट आणि त्यातील चालक दलातील सदस्यांना गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदरात नेण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.

गोळीबार करावा लागला 

तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ही एक मासेमारी करणारी बोट होती. बोट वेगाने पुढे जात होती. ही बोट रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाला गोळीबार करावा लागला. एक क्रू जखमी झाला आणि इतर दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. बोट जड असल्याने ICGS अंकितला मदतीसाठी वळविण्यात आले आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत ते जखाऊ बंदरात पोहोचणे अपेक्षित आहे.

अटारी सीमेवरही हेरॉईन जप्त

 पाकिस्तान सीमेवर ड्रग्ज पकडल्या जात असल्याच्या बातम्या सतत येत असतात. सीमाशुल्क विभागाने रविवारी पंजाबच्या अटारी सीमेवर 'मुलेठी'च्या मालामध्ये लपवून ठेवलेले 100 किलोहून अधिक हेरॉईन जप्त केले. मुलेठी'ची ही खेप अफगाणिस्तानातून आली होती. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे 700 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. सीमाशुल्क विभागाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, हेरॉईन अफगाणिस्तानातून दिल्लीतील एका व्यक्तीने आयात केले होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी