pakistan news : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अल्पवयीन हिंदू मुलाची निर्घृण हत्या,लैंगिक अत्याचारानंतर गळा आवळला

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 21, 2021 | 15:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका अल्पवयीन हिंदू मुलाचा लैंगिक छळ आणि निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यापैकी एकाने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Pakistan's Hindu province brutally kills minor Hindu boy, strangles him after sexual assault
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अल्पवयीन हिंदू मुलाची निर्घृण हत्या,लैंगिक अत्याचारानंतर गळा आवळला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अल्पवयीन हिंदू मुलाची निर्घृण हत्या,
  • लैंगिक अत्याचारानंतर गुन्हेगारांनी मुलाचा गळा आवळून खून केला
  • पोलिसांनी दोघांना अटक केली

इस्लामाबाद : पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका 11 वर्षीय हिंदू मुलावर लैंगिक अत्याचार करून नंतर निर्घृण हत्या करण्यात आली. संपूर्ण कुटुंब गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात व्यस्त असताना ही घटना घडली. शुक्रवारी सायंकाळपासून तो बेपत्ता होता आणि शनिवारी त्यांचा मृतदेह निर्जन घरात आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Pakistan's sidha province brutally kills minor Hindu boy, strangles him after sexual assault)

'द एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, शनिवारी सिंध प्रांतातील खैरपूर मीर भागातील बाबरलोई शहरातील एका निर्जन घरात मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तो शुक्रवारपासून बेपत्ता होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला. या अहवालात मृत मुलाचे नातेवाईक राज कुमार यांनी सांगितले की, “संपूर्ण कुटुंब गुरु नानक यांच्या जयंती उत्सवात व्यस्त होते. मुलगा कसा बेपत्ता झाला हे आम्हाला माहीत नाही.

२ आरोपींना अटक, एकाने गुन्ह्याची कबुली दिली

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचारानंतर गुन्हेगारांनी मुलाचा गळा आवळून खून केला. बाबरलोई पोलीस ठाण्याच्या एसएचओने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एकाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलगी बेपत्ता

त्याचवेळी बाल संरक्षण प्राधिकरण, सुक्कूरचे जुबेर महार यांनी सांगितले की, मुलाच्या शरीरावर अत्याचाराच्या खुणा आढळून आल्या आहेत. गेल्या काही आठवड्यांत राज्यातील ही दुसरी घटना असल्याचेही त्यांनी सांगितले. याच्या काही काळापूर्वी सुक्कूर जिल्ह्यातील सालेह पाट येथे हिंदू समाजातील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. याची माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी तिच्या शोधासाठी 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले, परंतु मुलीबद्दल काहीही माहिती सापडली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी