Shraddha Murder case: क्राईम सीरिज पाहून गर्लफ्रेंडचे 35 तुकडे केले, असं काय आहे या अमेरिकन टीव्ही शोमध्ये? 

Shraddha Murder: लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या एका पार्टनरने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाने गर्लफ्रेंडचे तब्बल 35 तुकडे केल्याचं उघड झालं आहे. 

palghar resident shraddha killed into 35 pieces by live in partner aftab by inspiring tv show as per reports read in marathi
आफताब आणि श्रद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून लिव-इनमध्ये राहत होते (Image Courtesy: Delhi Police) 
थोडं पण कामाचं
  • पालघरमधील गर्लफ्रेंडचे 35 तुकडे करुन जंगलात फेकले
  • आरोपी आफताब अमीन पूनावालाला पोलिसांनी केली अटक
  • पोलीस तपासात धक्कादायक माहिती झाली उघड

Shraddha and Aftab poonawalla: आफताब अमीन पूनावाला नावाच्या तरुणाने आपल्यासोबत लिव-इन मध्ये राहणारी गर्लफ्रेंड श्रद्धा हिची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने श्रद्धाची हत्या केल्यावर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि त्यानंतर ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकले. या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. आता आणखी एक खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, आरोपी आफताब याने अमेरिकन टीव्ही सीरिज डेक्स्टर (Dexter) पाहून हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. मात्र, या टीव्ही सीरिजमध्ये असं काय आहे? जाणून घ्या....

मिळालेल्या माहितीनुसार, जो टीव्ही शो पाहून आफताबने हत्या करण्याचं प्लॅनिंग केलं तो शो म्हणजे डेक्स्टर आहे. डेक्स्टर एक अमेरिकन क्राईम ड्रामा टीव्ही सीरिज आहे. हा टीव्ही शो ऑक्टोबर 2006 ते सप्टेंबर 2013 या कालावधीत एअर करण्यात आला होता. या टीव्ही शो मध्ये मायकल सी. हॉल ने मुख्य भूमिका केली होती आणि या शोच्या सर्व सिझन्सला खूपच पसंती मिळाली होती.

हे पण वाचा : योनी स्वच्छ ठेवण्यासाठी खास टिप्स

Dexter टीव्ही शो मध्ये असं आहे तरी काय? 

आफताब याने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या जो क्राईम शो पाहून केली त्या शोमध्ये नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घेऊयात याबाबत... या शोमध्ये डेक्स्टर मॉर्गन मुख्य भूमिकेत आहे. जो दिवसा गुन्ह्यांचा छडा लावतो आणि रात्री हत्या करतो.

हे पण वाचा : हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसण्याचे असंख्य फायदे​

हा शो पाहिल्यावर आफताब अमीन पूनावाला याने आपली गर्लफ्रेंड श्रद्धा हिची हत्या केली. आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले आणि त्यानंतर हे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले. इतकेच नाही तर या शरीराच्या अवयवांचा वास येऊ नये म्हणून आफताबने अगरबत्तींचा सुद्धा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. 

श्रद्धाची हत्या केल्यावर आफताबने 35 तुकडे केले आणि ते ठेवण्यासाठी एक मोठा फ्रिज खरेदी करुन आणला. तब्बल 18 दिवस हे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले आणि त्यानंतर रात्री 2 वाजता तो शरीराचे तुकडे एक-एक करुन प्लास्टिक बॅगमध्ये टाकून घराबाहेर नेत असे अन् ती बॅग इतरत्र फेकून येत असे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी