मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एकट्या मुलीला पाहून 'त्याने' उघडली पँटची चेन आणि...

तलावाच्या जवळ पीडित मुलगी मॉर्निंग वॉकसाठी गेली होती आणि याचवेळी आरोपी तरुण तेथे आला होता. या तरुणाने आपल्या पँटची चेन उघडून असं काही कृत्य केलं ज्याने सर्वांनाच एक धक्का बसला. 

pant zip open man force to hold private part morning walk bengaluru crime news marathi google
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. बंगळुरूमधील डोड्डानेकुंडी तलावाच्या परिसरात ही घटना घडली आहे. गेल्या शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. येथे एका निर्लज्ज तरुणाने एकट्या मुलीला पाहून आपल्या पँटची चेन उघडली आणि घृणास्पद कृत्य केलं.

पीडित मुलगी प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते. शनिवारी ती मॉर्निग वॉकसाठी तलावाच्या जवळ पोहोचली होती. यावेळी त्याच परिसरात एक तरुण आपल्या कुत्र्याला घेऊन आला होता. एकट्या तरुणीला पाहून त्या तरुणाने आपल्या पँटची चेन उघडली आणि त्यानंतर त्याचे गुप्तांग पकडण्यास सांगितले. यावेळी तरुणीने न घाबरता आरोपी तरुणाची कॉलर पकडली आणि त्याचा फोटो कॅमेऱ्यात कैद केला. यानंतर पीडित मुलीने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. 

आरोपीने आपल्या पँटची चेन उघडून या तरुणीला गुप्तांग पकडण्यास जबरदस्ती केली. यावेळी पीडित तरुणीने आरडाओरड सुरु केला आणि त्यामुळे आरोपी तरुण घाबरला आणि घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मग पीडित तरुीने त्याची कॉलर पकडली आणि त्याचा फोटोही कॅमेऱ्यात क्लिक केला. 

या संपूर्ण प्रकरणावर बंगळुरू मिरर सोबत बोलताना पीडित तरुणीने सांगितले की, "ही घटना माझ्यासाठी धक्कादायकच होती आणि या घटनेमुळे समजतं की अद्यापही आपल्या समाजातील अनेक लोकांचे अद्याप विचार हे घृणास्पद आहेत. मी कुत्र्याच्या जवळ होती आणि त्यावेळी आरोपीने माझ्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. हे सर्व इतक्या लवकर झालं की मला काही कळालंच नाही".

पीडित तरुणीने बंगळुरू पोलिसांत आरोपी तरुणाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि आरोपीला पोलीस लवकरच अटक करतील अशी अपेक्षा पीडित तरुणीने केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी