जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला;6-7 लोक ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

रामबन जिल्ह्यातील (Ramban District) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील (Jammu-Srinagar National Highway) एका बांधकामाधीन चार-लेन बोगद्याचा एक भाग गुरुवारी रात्री कोसळला. त्यात 9 जण अडकले असून त्यापैकी दोन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर उर्वरित सात जणांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. 

Part of tunnel under construction collapses on Jammu-Srinagar
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्याचा भाग कोसळला  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • खूनी नाल्यातील बोगद्याच्या पुढील बाजूचा एक छोटासा भाग ऑडिट दरम्यान कोसळला.
  • एकूण 9 जण बोगद्यात अडकले असून दोन जणांना वाचवण्यात यश
  • बोगद्यात अडकलेले कर्मचारी हे ऑडिट करण्यासाठी आलेले होते.

Jammu Kashmir Tunnel Collapsed:  श्रीनगर : रामबन जिल्ह्यातील (Ramban District) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील (Jammu-Srinagar National Highway) एका बांधकामाधीन चार-लेन बोगद्याचा एक भाग गुरुवारी रात्री कोसळला. त्यात 9 जण अडकले असून त्यापैकी दोन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर उर्वरित सात जणांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. 

एजन्सीने दिलेल्या अधिक माहितीनुसार,  खूनी नाल्यातील बोगद्याच्या पुढील बाजूचा एक छोटासा भाग ऑडिट दरम्यान कोसळला. बोगद्यात अडकलेले कर्मचारी हे ऑडिट करण्यासाठी आलेले होते. भाग कोसळल्यानंतर पोलीस आणि लष्कराने तातडीने संयुक्त बचाव मोहीम सुरू केलं. एकूण 9 जण बोगद्यात अडकले असून दोन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर सात जण अद्याप बोगद्यात अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, ही घटना रामबन जिल्ह्यात घडली असून यावेळी रामबनचे उपायुक्त, प्रकल्प संचालक, डीआयजी आणि एसएसपी उपस्थित होते. दरम्यान या दुर्घटना झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या बचाव मोहिमेसाठी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.

ढिगाऱ्याखाली अनेक वाहने आणि मशिन गाडले

बांधकामाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा बोगद्यासमोर बुलडोझर आणि ट्रकसह अनेक मशिन आणि वाहने उभी होती. बोगदा कोसळल्याने त्यांचेही पूर्ण नुकसान झाले आहे. रामबनचे उपायुक्त मसरतुल इस्लाम आणि एसएसपी मोहिता शर्मा बोगद्यात सुरू असलेल्या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी