Parvez Musharraf passes away: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आहे. दुबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परवेज मुशर्रफ यांच्या कुटुंबीयांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, अॅमायलॉयडोसिस या आजाराने ग्रस्त असलेल्या मुशर्रफ यांचं निधन झालं. त्यांना काही आठवड्यांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परवेज मुशर्रफ यांना अतिशय दुर्धर असा अॅमायलॉयडोसिस आजार झाला होता. हा आजार खूपच दुर्मीळ आहे.
2008 पर्यंत परवेज मुशर्रफ हे पाकिस्तानच्या राजकारणात सक्रीय होते. त्यांची कारकिर्द सुद्धा वादग्रस्त अशी राहिली आहे.
Former President of Pakistan, General Pervez Musharraf (Retd) passes away after a prolonged illness, at a hospital in Dubai: Pakistan's Geo News pic.twitter.com/W1fGRVb6xZ — ANI (@ANI) February 5, 2023
11 ऑग्सट 1943 मध्ये परवेज मुशर्रफ यांचा जन्म दरियागंज दिल्ली येथे झाला होता. 1947 मध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांनी पाकिस्तान सरकारसाठी काम करण्यास सुरुवात केली आणि परराष्ट्र मंत्रालयासोबत जोडले गेले.
हे पण वाचा : हे घरगुती उपाय करा अन् मानदुखीपासून आराम मिळवा
परवेज मुशर्रफ यांच्या वडिलांची पाकिस्तानातून तुर्कीला बदली झाली. 1949 मध्ये ते तुर्कीला गेले. तुर्कीत राहत असताना त्यांनी तुर्की भाषाही शिकली. आपल्या कुटुंबासोबत 1957 मध्ये पुन्हा पाकिस्तानात परतले. त्यांचे शालेय शिक्षण हे कराचीमधील सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये झाले.
हे पण वाचा : ड्रॅगन फ्रूट खा अन् चमत्कार पहा
परवेज मुशर्रफ यांना पाकिस्तानात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानाच्या इतिहासात प्रथमच पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने मुशर्रफ यांना शिक्षा सुनावली होती. परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानात आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि राज्यघटना निलंबित केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 31 मार्च 2014 मध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले होते.
मात्र, नंतर लाहोर कोर्टाने मुशर्रफ यांना सुनावलेली फाशीची शिक्षा असंवैधानिक असल्याचं म्हटलं आणि ही शिक्षा रद्द करण्यात आली.
हे पण वाचा : अननसाचे औषधी उपयोग, त्वचेची समस्या होईल दूर
परवेज मुशर्रफ हे कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख होते. अनेक पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाच्या संदर्भात तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना अंधारात ठेवलं होतं. कारगिल युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याने शौर्य दाखवत पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आणि युद्ध जिंकलं. यानंतर परवेज मुशर्फ आणि नवाज शरीफ यांच्यात बिनसलं होतं.