Plane Missing in Nepal: नेपाळच्या जंगलात प्रवासी विमान बेपत्ता; दिसत होते धुराचे लोट, खराब हवामानामुळे बचावकार्यास विलंब

नेपाळच्या (Nepal) तारा एअरचे (Tara Air) बेपत्ता विमान क्रॅश (Plane crash) झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुस्तांगच्या (Mustang) लारजुंगमध्ये (Larjung) विमान दुर्घटना घडली आहे. बचावकार्यासाठी घटनास्थळी हेलिकॉप्टर (Helicopter) पाठवण्यात आले आहे. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर थांबवण्यात आले आणि लष्कर आणि पोलिसांचे पथक अपघातस्थळी पाठवण्यात आले आहे. 

Plane Missing in Nepal
नेपाळच्या जंगलात प्रवासी विमान बेपत्ता  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • गेल्या अर्ध्या तासापासून विमानाचा एटीसीशी संपर्क झालेला नाही. विमान 10:35 पर्यंत एटीसीच्या संपर्कात होते.
  • खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर थांबवण्यात आले आणि लष्कर आणि पोलिसांचे पथक अपघातस्थळी पाठवण्यात आले
  • विमानात क्रूसह एकूण 22 प्रवासी आहेत. यापैकी 13 नेपाळी, 4 भारतीय आणि दोन जपानी नागरिक आहेत.

Plane Missing in Nepal: नेपाळच्या (Nepal) तारा एअरचे (Tara Air) बेपत्ता विमान क्रॅश (Plane crash) झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुस्तांगच्या (Mustang) लारजुंगमध्ये (Larjung) विमान दुर्घटना घडली आहे. बचावकार्यासाठी घटनास्थळी हेलिकॉप्टर (Helicopter) पाठवण्यात आले आहे. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर थांबवण्यात आले आणि लष्कर आणि पोलिसांचे पथक अपघातस्थळी पाठवण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तारा एअरमधील प्रवासी विमान उडविणारे कॅप्टन वसंत लामा विमान चालवत होते. तसेच मुंबईतील एकाच कुटुंबातील चार भारतीय प्रवासी त्या विमानातून प्रवास करत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या अर्ध्या तासापासून विमानाचा एटीसीशी संपर्क झालेला नाही. विमान 10:35 पर्यंत एटीसीच्या संपर्कात होते.

मोठा स्फोटाचा आवाज ऐकू आला

या विमानाने पोखराहून जोमसोमला उड्डाण केले. नंतर विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क तुटला. आता जोमसोम जवळील भागात आग लागल्याचे वृत्त मिळाले आहे. तर जोमसोम विमानतळ प्राधिकरणालाही स्फोटाचा  मोठा आवाज ऐकू आला. 

विमानात 13 नेपाळी, 4 भारतीय प्रवासी होते

तारा एअरच्या माहितीनुसार, विमानात क्रूसह एकूण 22 प्रवासी आहेत. यापैकी 13 नेपाळी, 4 भारतीय आणि दोन जपानी नागरिक आहेत. क्रू मेंबर्समध्ये विमानाचा पायलट कॅप्टन प्रभाकर प्रसाद घिमिरे, सहवैमानिक इटासा पोखरेल आणि एअर होस्टेस कासमी थापा यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी