Bengaluru Flight | चमत्कार! विमानतळावर उतरण्यापूर्वी फुटले टायर...पाहा कसे थोडक्यात बचावले 150 विमान प्रवासी

Flight Accident : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (KIAL) उतरण्यापूर्वी विमानाचा टायर फुटल्याने थाई एअरवेजचे विमान सुखरूप बचावले. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार विमानात क्रू मेंबर्ससह किमान 150 प्रवासी होते. ही घटना मंगळवारी रात्री (26 एप्रिल) घडली. बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाचे 256 आसनी TG 325 हे विमान बँकॉकहून टेकऑफ झाले होते आणि 26 एप्रिल रोजी बेंगळुरूमध्ये रात्री 11:32 वाजता येथे उतरले होते.

Thai Airways Aircraft suffered a tyre burst
बंगळूरू येथे उतरणाऱ्या विमानाचे टायर हवेतच फुटले 
थोडं पण कामाचं
  • विमानाचा टायर फुटल्याने थाई एअरवेजचे विमान सुखरूप बचावले
  • बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यापूर्वी ही घटना घडली.
  • सूत्रांनी स्पष्ट केले की, टायर फुटल्याने विमान सुरक्षितपणे डांबरी मार्गावर उतरले

Aircraft suffered a tyre burst : बंगळूरू : एरवी तुम्ही चित्रपटात विमानांसंदर्भातील अनेक थरारक दृश्ये पाहत असता. मात्र थाई एअरवेजच्या प्रवाशांना असाच एक थरार नुकताच हवेतच अनुभवायला मिळाला. झाले असे की थाई एअरवेजचे एक बोईंग विमान बॅंकॉकहून उड्डाण घेऊन बंगळूरूला निघाले होते. मात्र बंगळूरू विमानतळावर उतरण्यापूर्वीच या विमानाचे टायर हवेतच फुटले. एरवी हा विमान आणि विमानातील प्रवाशांसाठी जीवावर बेतणााराच प्रसंग होता. मात्र सुदैवाने विमानातील 150 प्रवासी सुखरुप बचावले आणि मोठा अनर्थ होण्याचे टळले. हा सर्व थरार बंगळूरूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वर आकाशातच सुरू होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरूच्या (Bengaluru)केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kempegowda International Airport) उतरण्यापूर्वी विमानाचा टायर फुटल्याने थाई एअरवेजचे विमान (Thai Airways flight) सुखरूप बचावले. विमान हवेतच असताना विमानाचे टायर फुटले होते. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार विमानात क्रू मेंबर्ससह किमान 150 प्रवासी होते.(Passengers of Bengaluru flight escaped unhurt after the aircraft suffered a tyre burst)

अधिक वाचा : २०० वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू

ही घटना बेंगळुरूच्या (Bengaluru)केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री (26 एप्रिल) घडली आणि बुधवारी संध्याकाळी (27 एप्रिल) एअरलाइन्सचे तांत्रिक पथक सुटे चाक घेऊन आले. विमानतळाच्या सूत्रांनी खातरजमा केली की विमान 28 एप्रिल रोजी बेंगळुरूहून बँकॉकला जाईल. एका थरारक संकटातून थाई एअरवेजचे 150 प्रवासी सुखरुप बचावले आहेत.

बॅंकॉकहून निघालेले विमान

बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाचे 256 आसनी TG 325 हे विमान बँकॉकहून टेकऑफ झाले होते आणि 26 एप्रिल रोजी बेंगळुरूमध्ये रात्री 11:32 वाजता येथे उतरले होते. सूत्रांनी स्पष्ट केले की, टायर फुटल्याने विमान सुरक्षितपणे डांबरी मार्गावर उतरले.

अधिक वाचा : Ratan Tata चा सुटला संयम, PM मोदींसमोर तोडक्या मोडक्या हिंदीत बोलले..

हवेतच फुटले विमानाचे टायर

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा स्फोट हवेतच झाला परंतु वैमानिकांच्या लक्षात आला. बंगळुरू विमानतळावरील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की प्रवासी आणि क्रू यांच्यासाठी ही एक चमत्कारी सुटका होती. विमानासह प्रवासी बचावले हा एक चमत्कारच होता.

विमानाची पुढील ट्रिप रद्द

विमानातील लोकांना उतरवल्यानंतर विमान तपासणीसाठी नेण्यात आले. सूत्रांनी स्पष्ट केले की हे विमान बुधवारी (27 एप्रिल) बंगळुरूहून बँकॉकला जाणार होते, परंतु या घटनेनंतर ट्रिप रद्द करण्यात आली.

अधिक वाचा : Fuel Prices | पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा महाविकास आघाडीला इंधन दरावरून सवाल

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत केंद्रीय मंत्री पायलटशी बोलताना दिसत आहेत. यावर सोशल मीडिया यूजर्स मजेशीर कमेंट करताना फोटो शेअर करत आहेत. हा फोटो स्वतः ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अरुणाचल प्रदेशातील पासीघाट विमानतळावर पोहचले डॉर्नियर - 228 लाँच केले. याबाबत माहिती देताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि स्वतः पायलटशी बोलत असल्याचा फोटोही शेअर केला आहे. त्यानंतर त्याचा दुसरा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी