इंग्लंडमध्ये एक रुग्ण ५०५ दिवस कोरोनाबाधीत

Patient In UK Was Infected With Corona Virus For 505 Days : युरोपमधील देश अनेकदा स्वतःच्या वैद्यकीय सेवांचा जगासमोर गुणगौरव करत असतात. पण याच युरोपमध्ये कोरोना संकट मोठ्या प्रमाणात पसरले. इंग्लंडमध्ये तर एक रुग्ण ५०५ दिवस कोरोनाबाधीत होता.

Patient In UK Was Infected With Corona Virus For 505 Days
इंग्लंडमध्ये एक रुग्ण ५०५ दिवस कोरोनाबाधीत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • इंग्लंडमध्ये एक रुग्ण ५०५ दिवस कोरोनाबाधीत
  • अनेक वर्षांपासून एखाद्या आजारावर उपचार घेत असलेल्यांमध्ये सरासरी ७३ दिवस कोरोनाबाधीत राहिल्याची अनेक उदाहरणे
  • एनएचएस फाउंडेशन ट्रस्टचे लंशोधन

Patient In UK Was Infected With Corona Virus For 505 Days : लंडन : युरोपमधील देश अनेकदा स्वतःच्या वैद्यकीय सेवांचा जगासमोर गुणगौरव करत असतात. पण याच युरोपमध्ये कोरोना संकट मोठ्या प्रमाणात पसरले. इंग्लंडमध्ये तर एक रुग्ण ५०५ दिवस कोरोनाबाधीत होता. कोरोना या आजाराने ५०० दिवसांपेक्षा जास्त काळ पीडित असलेला हा जगातील पहिलाच रुग्ण असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या संदर्भात तज्ज्ञ इतर देशांमधील स्थितीची पडताळणी करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार सध्या ५०५ दिवस कोरोनाबाधीत राहिल्याचे एकच उदाहरण पुढे आले आले.

जे नागरिक अनेक वर्षांपासून एखाद्या आजारावर उपचार घेत आहेत अशा रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर विषाणूच्या संरचनेत काही बदल होतात का या संदर्भात संशोधन सुरू आहे. हे संशोधन सुरू असतानाच इंग्लंडमध्ये एका रुग्ण ५०५ दिवस कोरोनाबाधीत होता हे उघड झाले. 

एनएचएस फाउंडेशन ट्रस्टच्या संशोधनानुसार अनेक वर्षांपासून एखाद्या आजारावर उपचार घेत असलेल्यांमध्ये सरासरी ७३ दिवस कोरोनाबाधीत राहिल्याची अनेक उदाहरणे आढळली आहेत. दोन रुग्ण जुन्या आजारांवर उपचार घेत होते आणि कोरोनामुळे एक वर्षापेक्षा जास्त पीडित होते असेही संशोधनातून उघड झाले. 

जुन्या आजारावर उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाला. या व्यक्तीवर रेमेडेसिविरद्वारे उपचार झाले होते. संबंधित व्यक्ती २०२० मध्ये कोरोनाबाधीत आढळली आणि उपचारांनंतर बरी झाली. पण संबंधित व्यक्तीचा २०२१ मध्ये मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण संशोधकांनी जाहीर केलेले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी