लघवीला गेला अन् कळालं प्रायव्हेट पार्टच झालाय गायब, रुग्णालयात चाललंय तरी काय?

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला विचित्र अनुभव आल्याचं समोर आलं आहे. हा रुग्ण लघवी करण्यासाठी टॉयलेटमध्ये गेला असता त्याचे गुप्तांगच नसल्याचं आढळून आलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: iStock) 
थोडं पण कामाचं
  • रुग्णालयात घडला विचित्र प्रकार
  • ऑपरेशननंतर रुग्ण लघवीला जाताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकरली 
  • रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ

Shocking news: रुग्णालयात एका व्यक्तीसोबत विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीचं गुप्तांग गायब झाल्याचं कळालं आणि रुग्णाला मोठा धक्का बसला. या घटनेनंतर संपूर्ण रुग्णालयात एकच खळबळ उडाली. झारखंड राज्यातील पलामू जिल्ह्यातील ही घटना आहे. येथील डाल्टनगंजमधील एका खासगी रुग्णालयात ही विचित्र घटना घडली आहे. नेमकं घडलंय तरी काय?... (patient private part missing while treatment going on in hospital in daltonganj jharkhand crime news marathi)

एका व्यक्तीला लघवी करताना त्रास जाणवत होता. त्यामुळे तो उपचारासाठी डाल्टनगंज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला. तेथील डॉक्टरांनी त्याला गुप्तांगाचे एक छोटे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. त्यानंतर हा रुग्ण ऑपरेशनसाठी तयार झाला. आवश्यक त्या सर्व चाचण्या पूर्ण केल्यावर या रुग्णाच्या गुप्तांगाचं ऑपरेशन करण्यात आलं.

हे पण वाचा : शनिवारी संध्याकाळी करा हा उपाय, सर्व समस्या झटक्यात होतील दूर

ऑपरेशन यशस्वी झाल्यावर या रुग्णाला सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यानंतर रात्रीच्या सुमारास या रुग्णाला जेव्हा लघवी करण्यासाठी जाग आली. तेव्हा तो टॉयलेटमध्ये गेला. मात्र, तेथे गेल्यावर आपलं गुप्तांगच नसल्याचं पाहून त्याला धक्का बसला. यानंतर रुग्णालयाने संपूर्ण रुग्णालयात गोंधळ घातला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनीही रुग्णालयात गर्दी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा गोंधळ पाहून डॉक्टर, संचालक आणि इतर स्टाफने रुग्णालयातून पळ काढला.

हे पण वाचा : पगार होताच तात्काळ करा हे काम, पैशांची चणचण भासणार नाही

न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, प्रभारी सिविल सर्जन विजय सिंह यांनी या रुग्णाचा भ्रम दूर केला. त्यांनी सांगितले की, या व्यक्तीला लघवी करण्यास त्रास होत होता आणि त्यामुळे त्याच्यावर एक ऑपरेशन करण्यात आलं. याला सर्कम्सिजन सर्जरी असे म्हणतात. त्यांनी सांगितले की, गुप्तांगाचा पुढील भाग कापण्यात आला. काही दिवस सूज राहील आणि नंतर सर्व व्यवस्थित होईल. या रुग्णाने प्रथम पाहिल्यावर तो गोंधळून गेला अन् घाबरला, त्याला वाटले की, त्याचे गुप्तांग कापून टाकले आहे मात्र तसे काही नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी