ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीतल्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

Corona Virus in Gurugram: दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये, एका व्यक्तील कोरोना व्हायरसची लागणची माहिती समोर आली आहे. हा व्यक्ती पेटीएममध्ये काम करतो आणि तो नुकताच इटलीमधून परतला.

Corona Virus in Gurugram
ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीतल्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण 

गुरुग्रामः घातक असा कोरोना व्हायरस भारतात दाखल झाला आहे. दिल्लीच्या शेजारचं राज्य गुरुग्राममध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुग्राममध्ये पेटीएमच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. कंपनीनं बुधवारी एक निवेदन जारी करुन ही माहिती दिली. निवेदनात म्हटलं आहे की, हा कर्मचारी नुकताच इटलीहून सुट्टी संपवून परतला होता. जो कोरोना व्हायरसनी सर्वात जास्त प्रभावित देशांपैकी एक आहे.

कंपनीनच्या निवेदनानुसार, पेटीएमनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पुढचे काही दिवस घरातून काम करण्याची सूचना दिली आहे. सध्या कंपनीचे गुरुग्राम भागाची स्वच्छता केली जात आहे. 

भारतात सध्या 28 केस पॉझिटिव्ह आहे - हर्षवर्धन

 कोरोना व्हायरस संदर्भात भारतात घेतलेल्या खबरादारीबाबत माहिती देताना आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, आम्ही अधिकारी आणि दिल्ली सरकारसोबत बैठक घेतली आहे. सर्व हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्ड बनविण्यात आले आहे. तसेच हॉस्पिटलला सुविधा वाढविण्याचे आदेश दिले आहेत. आग्रा येथील एका कुटुंबातील 6 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाली. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दिल्ली एक केस होती, त्याने 66 जणांशी संपर्क केला होता. 

आम्ही दिल्ली सरकारसोबत मिळून काम करत आहोत. 12 देशांतून आलेल्या लोकांची स्क्रिनिंग सुरू आहे. एअरपोर्टमधील नागरिकांची तपासणी सुरू आहे. इटलीतून आलेल्या 16 जणांना कोरोनाची व्हायरसची बाधा झाली आहे. त्यात एक भारतीयाचा समावेश आहे. भारतातून इराणला शास्त्रज्ञ पाठविण्यात येणार आहे. बाहेर देशातून आलेल्यांची स्क्रिनिंग केली जात आहे. मंगळारी सायंकाळपर्यंत 5 लाख 89 हजार लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. केरळमध्ये जे पण पॉझिटिव्ह सापडले होते. ते बरे झाले आहेत. आतापर्यंत भारतात 28 जण पॉझिटिव्ह सापडले आहे. यात 9 भारतीय आणि 16 इटलीचे नागरिक आहेत. यात 3 बरे झाले आहेत. टेस्टसाठी 15 लॅब बनविण्यात आल्या आहेत. तसेच 19 आणखी बनविण्यात येणार आहेत.  

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा नाही साजरी करणार होळी 

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून सांगितले की मी यंदा होळी साजरी करणार नाही. पंतप्रधानांना कोरोना व्हायरसमुळे तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी समारंभात सामिल होण्यास मनाई केली आहे. 

केंद्रीय मंत्री अमित शहा यांना ट्विट करून म्हटले की होळी भारतीयांसाठी एक महत्त्वाचा सण आहे. पण कोरोना व्हायरसमुळे या वर्षी मी होळी मिलन समारंभात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी सर्वांना सार्वजनिक समारंभांपासून दूर राहण्याचा आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचे आव्हान करतो. 

मास्क घालून संसदेत पोहचल्या खासदार 

कोरोना व्हायरसची भीती सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अपक्ष खासदार नवनीत राणा मास्क घालून संसदेत दाखल झाल्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी