'या' शहरातील नागरिकांना यावर्षी सूर्य दर्शन नाही, २३ जानेवारी २०२१पर्यंत पाहावी लागणार वाट

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 21, 2020 | 13:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Utqiagvik Alaska polar night: अलास्काच्या उतक्वियाग्विक या शहरात आता सूर्य दोन महिन्यानंतरच दिसणार आहे. ही अद्भुत घटना येथे दरवर्षी होते ज्याला पोलार नाईट या नावाने ओळखले जाते.

Utquagvik city in Alaska
यावर्षी आता या शहरातील लोकांना नाही होणार सूर्याचे दर्शन, २३ जानेवारी २०२१पर्यंत पाहावी लागणार वाट 

थोडं पण कामाचं

  • अलास्काच्या उतक्वियाग्विक या शहरात आता ६६ दिवसांनंतर दिसणार सूर्य
  • या शहरात १९ नोव्हेंबर रोजी झाले होते सूर्याचे शेवटचे दर्शन
  • साधारण चार हजार लोकसंख्येचे आहे उतक्वियाग्विक शहर

नवी दिल्ली: अलास्कामध्ये (Alaska) असे एक शहर (city) आहे जिथे सूर्य रोज उगवत (no daily sunrise) नाही आणि जेव्हा तो अस्ताला (sunset) जातो तेव्हा थेट ६६ दिवसांनंतरच उगवतो (sunrise after 66 days). या शहराचे नाव आहे उतक्वियाग्विक (Utqiagvik). इथे १९ नोव्हेंबर (November) रोजी सूर्याने शेवटचे दर्शन (last sunrise) दिले होते. याचा अर्थ २० नोव्हेंबर ते २२ जानेवारी २०२१पर्यंत इथे संपूर्ण अंधार (complete darkness) राहील. इथे आता सूर्य थेट ६६ दिवसांनी म्हणजे २३ जानेवारी २०२१ला उगवेल. याला पोलार नाईट (Polar Night) या नावाने ओळखले जाते. ज्यादिवशी सूर्याचे शेवटचे दर्शन होते त्यादिवशी लोक उत्सव साजरा (celebrations) करतात आणि ज्यादिवशी सूर्य पुन्हा उगवतो तो दिवसही सणासारखा साजरा केला जातो.

अलास्कामध्ये दरवर्षी घडते ही अद्भुत घटना

अलास्का हा प्रदेश धृवीय प्रदेशात येतो. इथे दरवर्षी ही घटना घडते आणि असा देखावा असतो जिथे ६६ दिवस सूर्यदर्शन होत नाही. यावर्षी १९ नोव्हेंबर रोजी सूर्य शेवटचा दिसला होता. आता यानंतर थेट २३ जानेवारी रोजी उतक्वियाग्विक शहरात सूर्याचे दर्शन होईल. या शहराचे सरासरी तापमान उणे ५ अंशापेक्षाही खाली असते.

साधारण चार हजार लोकसंख्येचे आहे उतक्वियाग्विक शहर

साधारण चार हजार लोकसंख्येच्या उतक्वियाग्विक शहरात सूर्य आणि प्रकाशाविना वातावरण खूप थंड असते. कडाक्याच्या थंडीचा सामना करणे इथल्या लोकांसाठी सोपे नसते. मात्र अशी परिस्थिती दरवर्षीच येत असल्याने ते यासाठी मानसिकदृष्ट्या तयार असतात. अनेकदा इथले तापमान उणे १० किंवा २० डिग्रीपर्यंत जाते. दोन महिन्यांच्या अंधारादरम्यान या शहराचे सरासरी तापमानही उणे ५ डिग्रीपेक्षाही खाली जाते.

पोलार नाईट चालू होताच इथे वाढतो थंडीचा कडाका

पोलार नाईट चालू होताच या भागात थंडी वाढते. नोव्हेंबर ते जानेवारी यादरम्यान इथे तापमान ५ ते १० डिग्री फॅरनहाईट म्हणजेच उणे २० ते २३ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते. उत्तर धृवाच्या दिशेने पुढे जाताना हिवाळ्यात काही ठिकाणी दिवस इतके छोटे असतात की तिथे प्रकाश असतच नाही आणि पूर्ण अंधार असतो. थंडीच्या दिवसातही अंधारच असतो, कारण याचे स्थान हे आर्क्टिक सर्कलपेक्षा उंचीवर असल्याने सूर्य इथे क्षितिजावर येऊ शकत नाही आणि या स्थितीला विज्ञानाच्या भाषेत पोलार नाईट म्हटले जाते. ही घटना हिवाळ्यात पोलार सर्कलमध्ये घडते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी