Piyush Jain : ज्याच्या घरात होते कोट्यवधी रुपये, तो पियुष जैन चालवायचा जुनी स्कूटर, मित्र, नातेवाईकांकडून घ्यायचा कर्ज

Piyush Jain use old scooter and car उत्तर प्रदेशमधील अत्तराचा व्यापारी पियुष जैन याच्या घरी कोट्यवधी रुपयांची संपत्ती सापडली आहे. पियुष जैनकडे इवढे पैसे होते की नोटा मोजण्यासाथी अक्षरशः पैसे मोजण्याची मशीन वापरावी लागली. अगदी कुबेरालाही लाजवेल एवढी संपत्ती पियुष जैनने जमा केली होती.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • अत्तराचा व्यापारी पियुष जैन याच्या घरी कोट्यवधी रुपयांची संपत्ती सापडली आहे.
  • कुबेरालाही लाजवेल एवढी संपत्ती पियुष जैनने जमा केली होती.
  • कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे अशी सारखी तक्रार करणार्‍या पियुष जैनच्या घरी कोट्यवधी रुपयांचे घबाड

Piyush Jain :  नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील अत्तराचा व्यापारी पियुष जैन याच्या घरी कोट्यवधी रुपयांची संपत्ती सापडली आहे. पियुष जैनकडे इवढे पैसे होते की नोटा मोजण्यासाथी अक्षरशः पैसे मोजण्याची मशीन वापरावी लागली. अगदी कुबेरालाही लाजवेल एवढी संपत्ती पियुष जैनने जमा केली होती. घरात कोट्यवधी रुपये असतना पियुष जैन एक साधी खटारा असलेली स्कूटर वापरायचा. 

आपल्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे अशी सारखी तक्रार करणार्‍या पियुष जैनच्या घरी कोट्यवधी रुपयांचे घबाड होते. जगाला फसवून तो कोट्यवधी रुपयांची हेराफेरी करत होता. 

पियुष जैनच्या घरी काय काय सापडलं?

जीएसटी विभागाच्या अधिकार्‍यांनी पियुष जैनच्या कानपूरच्या घरी छापा मारला. त्यानंतर कनौज येथील घरातही अधिकार्‍यांनी धाड घातली. पियुष जैनच्या घरी एवढी रोख रक्कम आढळली की अधिकारी नोटा मोजायचे मशीन घेऊन तब्बल पाच दिवस फक्त नोटाच मोजत होते. एका चित्रपटाला लाजवेल असे दृश्य पियुष जैनच्या घरी दिसत होते. जैनच्या घरातील भिंत, छत, कपाट आणि तळघरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली. जैनच्या कानपूरमधील घरातून १७७ कोटी तर कनौजमधील घरातून १७ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच ६४ किलो सोनं, अडीचशे किलो चांदी आणि ६०० लिटर चंदनाचे तेल सापडले आहे. 


सामान्य व्यावासायिक

अत्तराचा व्यवसाय करणारा पियुष जैन एक जुनी स्कूटर वापरायचा. येण्या जाण्यासाठी पियुष जैन एक जुनी सँट्रो कार वापरायचा. त्यासाठी जनमानसात पियुष जैन हा एक सामान्य आणि एक छोटा व्यावसायिक आहे अशी प्रतिमा निर्माण झाली होती. जैनचे शेजारीही त्याला एक सामान्य व्यावसायिक समजायचे, साधासुधा वाटणार्‍या पियुष जैनच्या घरी कोट्यवधी रुपये आणि सोनं चांदी असेल असा विचारही त्यांनी केला नव्हता.


कर्ज असल्याची तक्रार

लोकांना फसवण्यासाठी पियुष जैन हा सारखा आपल्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज असल्याचे खोटं सांगायचा. मित्र आणि नातेवाईकांना सांगायचा की व्यापारात मला सारखा नुकसान होत आहे. आपण सामन्य व्यावसायिक आहे ठसवण्यासाठी पियुष जैन आपल्या मित्र आणि नातेवाईकांकडून कर्ज घ्यायचा. 

वकीलांची फौज

जीएसटी विभागाने पियुष जैनला कोर्टात सादर केले. यावेळी पियुष जैनची बाजू मांडण्यासाठी वकीलांची फौज होती.  कोर्टाने पियुष जैनला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी