पेट्रोल, डिझेलच्या किंमती भडकल्या, मुंबई,दिल्लीत हे आहेत दर

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 07, 2021 | 15:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

८२ दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहे. या बदलामाागे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींना जबाबदार धरले जात आहे. 

Petrol diesel
पेट्रोल, डिझेलच्या किंमती भडकल्या, मुंबई,दिल्लीत हे आहेत दर 

थोडं पण कामाचं

  • तब्बल एका महिन्यांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ
  • मुंबई आणि दिल्लीतही पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ
  • कोविड १९ महामारीदरम्यान ८२ दिवसांमध्ये किंमतीत काहीसा खास बदल झाला नव्हता. 

मुंबई: देशातील प्रमुख शहरांमध्ये गुरूवारी(७ जानेवारी)ला पेट्रोलच्या दरात २१-२४ पैसे प्रती लीटर आणि डिझेलच्या किंमतीत २६-२९ रूपयांची वाढ झाली. तब्बल एक महिन्याच्या अंतराने दुसऱ्या दिवशी सलग या किंमतीत वाढ झाली. १९ जूनला देशभरात इंधनाच्या किंमतीत वाढ झाली होती आणि ती यासाठी खास होती कारण कोविड १९ महामारीदरम्यान ८२ दिवसांमध्ये किंमतीत काहीसा खास बदल झाला नव्हता. 

प्रमुख शहरांमधील दर

दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर बुधवारी ८३.९७च्या तुलनेत ८४.२० रूपचे प्रती लीटरवर पोहोचले. तर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटच्या आकड्यांनुसार डिझेलच्या किंमती ७४.३८ रूपये प्रती लीटरवर पोहोचले. राष्ट्रीय राजधानीमध्ये पेट्रोलच्या किंमतीनी आज ऑक्टोबर २०१८मध्ये गाठलेला ८४चा उच्च स्तर पार केला. बुधवारी या दरात २३ पैशांची वाढ होत मुंबईमध्ये हे दर एका लीटरमागे ९०.८३ रूपये इतके झाले. एक लीटर डिझेलची किंमत ८१.०७ रूपये आहे. कोलकातामद्ये पेट्रोलचे दर प्रती लीटर २४ पैशांनी वाढून ते ८५.६८ रूपये इतके झाले. हे दर बुधवारी ८५.४४ रूपये इतके होते. डिझेलची किंमत बुधवारच्या तुलनेत ७७.९७ रूपये प्रती लीटर म्हणजेच २७ पैशांनी अधिक होती. याप्रमाणेच चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८६.९६ रूपये आणि ७९.७२ रूपये आहे. 

मुंबईत हे दर

पेट्रोल 

आज - प्रती लीटर - ९०.८३ रूपये(०.२३ रूपयांची वाढ)

काल - ९०.६० रूपये प्रती लीटर(०.२६ रूपयांची वाढ)

डिझेल

आज - प्रती लीटर ८१.०७ रुपये (०.२९ रुपयांची वाढ)

काल- प्रति लीटर ८०.७८ रुपये (०.२७ रूपयांची वाढ)


ऑटो इंधनवर कर

विविध स्थानिक कर आणि वॅटमुळे इंधनाचे दर हे प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. 

कच्चे तेल

आंतरराष्ट्रीय बाजारात गुरूवारी कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर होत्या. ब्रेंट क्रूड ऑईल वायदा ८ सेंटनी वाढत ५४.३८ डॉलर प्रती बॅरल इतके होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी