Petrol Diesel Grant : 'या' राज्यात स्वस्तात पेट्रोल डिझेल मिळणार!

Petrol Diesel Price in Jharkhand slash by 25 rupees from 26 Jan 2022 : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटीत मोठी कपात केली. दिवाळीच्या मुहूर्तावर ही घोषणा केली. या घोषणेला जवळपास दोन महिने होत असताना झारखंड सरकारने राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी घोषणा केली. 

Petrol Diesel Price in Jharkhand slash by 25 rupees
'या' राज्यात स्वस्तात पेट्रोल डिझेल मिळणार! 
थोडं पण कामाचं
  • 'या' राज्यात स्वस्तात पेट्रोल डिझेल मिळणार!
  • BPL (Below Poverty Line - दारिद्र्यरेषेखालील) कार्डधारकांना त्यांच्या दुचाकी वाहनांसाठी इंधन अनुदान
  • दरमहा २५० रुपयांचे इंधन अनुदान

Petrol Diesel Price in Jharkhand slash by 25 rupees from 26 Jan 2022 announce CM Hemant Soren : रांची : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटीत मोठी कपात केली. दिवाळीच्या मुहूर्तावर ही घोषणा केली. या घोषणेला जवळपास दोन महिने होत असताना झारखंड सरकारने राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी घोषणा केली. 

झारखंड सरकार प्रति लिटर २५ रुपये याप्रमाणे दरमहा दहा लिटर पेट्रोल वा डिझेलसाठी २५० रुपयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करणार आहे. हे अनुदान BPL (Below Poverty Line - दारिद्र्यरेषेखालील) कार्डधारकांना त्यांच्या दुचाकी वाहनांसाठीच मिळेल. अनुदान प्रजासत्ताक दिनापासून म्हणजेच २६ जानेवारी २०२२ पासून मिळणार आहे.

मोदी सरकारने देशातील बँक खात्यांना आधार क्रमांकांशी संलग्न करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ज्यांची खाती आधारशी संलग्न आहेत अशा पात्र नागरिकांना केंद्र सरकारकडून मिळणारी विविध प्रकारची अनुदानं थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात. या व्यवस्थेचा लाभ घेत झारखंडच्या सोरेन सरकारने राज्यातील BPL (Below Poverty Line - दारिद्र्यरेषेखालील) कार्डधारकांना त्यांच्या प्रत्येक दुचाकी वाहनासाठी दरमहा २५० रुपये प्रमाणे इंधन अनुदान (पेट्रोल अनुदान वा डिझेल अनुदान) देण्याची घोषणा केली आहे. अनुदान थेट बँक खात्यात जमा होईल. अनुदान मिळणार असल्यामुळे BPL (Below Poverty Line - दारिद्र्यरेषेखालील) कार्डधारकांच्या इंधनावरील खर्चात दरमहा किमान २५० रुपयांची बचत होणार आहे. अप्रत्यक्षपणे त्यांना इंधन स्वस्तात उपलब्ध होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी