३७ हजार फुटांच्या उंचीवर दोन्ही वैमानिक गाढ झोपले, जाणून घ्या कसे वाचले प्रवाशांचे प्राण 

Pilots Fall Asleep At 37000 Feet, Miss Landing At Addis Ababa Airport, Know How Lives Of Flight Passengers Were Saved : विमान आकाशात ३७ हजार फूट उंचीवर असताना दोन्ही वैमानिकांना गाढ झोप लागली. वैमानिक झोपले असल्यामुळे बोइंग ७३७ विमान अदीस अबाबा विमानतळावर उतरले नाही....

Pilots Fall Asleep At 37000 Feet, Miss Landing At Addis Ababa Airport, Know How Lives Of Flight Passengers Were Saved
३७ हजार फुटांच्या उंचीवर दोन्ही वैमानिक गाढ झोपले, जाणून घ्या कसे वाचले प्रवाशांचे प्राण   |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ३७ हजार फुटांच्या उंचीवर दोन्ही वैमानिक गाढ झोपले, जाणून घ्या कसे वाचले प्रवाशांचे प्राण 
  • विमानाने आकाशात ३७ हजार फुटांची उंची कायम राखत विमानतळ ओलांडले
  • विमान पुढे जाऊ लागले

Pilots Fall Asleep At 37000 Feet, Miss Landing At Addis Ababa Airport, Know How Lives Of Flight Passengers Were Saved : विमान हा प्रवासाचा सर्वात वेगवान पर्याय समजला जातो. एका ठिकाणाहून विमानाने झटपट दुसऱ्या ठिकाणी जाता येते. यामुळे लांबच्या प्रवासाकरिता अनेकजण विमान प्रवासाचा पर्याय निवडतात. पण काही वेळा हा वेगवान प्रवास धोकादायक पण ठरू शकतो. ताजी घटना आफ्रिका खंडात इथिओपिया येथे घडली. सुदानमधील खार्तूम येथून एक प्रवासी वाहतुकीचे विमान (ET343) इथियोपियाची राजधानी अदीस अबाबा येथ जात होते. विमान आकाशात ३७ हजार फूट उंचीवर असताना दोन्ही वैमानिकांना गाढ झोप लागली. वैमानिक झोपले असल्यामुळे बोइंग ७३७ विमान अदीस अबाबा विमानतळावर उतरले नाही. उतरण्यासाठी ३७ हजार फुटांवरून टप्प्याटप्प्याने खाली येण्याची प्रक्रिया पण विमानाने सुरू केली नव्हती. यामुळे अदीस अबाबा विमानतळावरील नियंत्रण कक्षातले अधिकारी चक्रावले, त्यांनी विमानाच्या वैमानिकांना वारंवार संदेश पाठवला. पण वैमानिकांनी संदेशाला प्रतिसाद दिला नाही, ते गाढ झोपेत होते. विमानाने आकाशात ३७ हजार फुटांची उंची कायम राखत अदीस अबाबा विमानतळ पूर्णपणे ओलांडले आणि विमान पुढे जाऊ लागले. यानंतर विमानातील ऑटो पायलट सिस्टिम आपोआप बंद झाली आणि धोक्याचा सायरन वाजू लागला. हा सायरन वाजताच गाढ झोपलेल्या दोन्ही वैमानिकांना जाग आली आणि त्यांनी तातडीने विमान सावरण्यास सुरुवात केली.

वैमानिकांनी अदीस अबाबा विमानतळाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान उतरविण्याचे प्रयत्न सुरू केले. तब्बल २५ मिनिटांनी विमान सुरक्षितरित्या अदीस अबाबा विमानतळावर उतरले. सर्व प्रवासी सुरक्षितरित्या विमानातून उतरले. यानंतर अदीस अबाबा विमानतळावर दोन्ही वैमानिकांची कसून चौकशी झाली. तब्बल अडीच तास चौकशी सुरू होती. सततच्या कामाचा ताण आल्यामुळे गाढ झोप लागली असे दोन्ही वैमानिक वारंवार सांगत होते. अखेर त्यांच्या बोलण्यात तथ्य असल्याची खात्री चौकशी करणाऱ्यांना पटली. यानंतर दोन्ही वैमानिकांना पुढील काही तास कोणतेही विमान न उडवता विश्रांती घेण्यास सांगण्यात आले. नंतर वैमानिकांची दुसरी टीम बोइंग ७३७ विमानात बसली आणि विमानाने पुढील प्रवासाकरिता उड्डाण केले.

याआधी मे २०२२ मध्ये एक विमान न्यूयॉर्क येथून रोमला जाण्यासाठी निघाले. या विमानाने दीर्घकाळ ३८ हजार फूट उंचीवर कायम राहून रोमचे विमानतळ ओलांडले. नंतर सायरन वाजल्यामुळे झोपलेल्या दोन्ही वैमानिकांना जाग आली. त्यांनी तातडीने रोमच्या विमातळावर विमान उतरविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि थोड्याच वेळात विमान उतरविले होते. एकाच वर्षात दोन वेळा वैमानिकांच्या झोपेमुळे प्रवासी संकटात सापडले होते. सुदैवाने विमान उतरले आणि पुढचे संकट टळले. पण तिसऱ्यांदा हा प्रकार होऊ नये यासाठी सर्व विमान कंपन्यांनी ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. वैमानिकांवर कामाचा ताण येऊ नये यासाठी व्यवस्थित नियोजन होणे आवश्यक असल्याचे मत प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी