Wrong Pizza Delivery : नवी दिल्ली : पिझ्झा (Pizza) हे नाव ऐकल्याबरोबर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मग तुम्ही शाकाहारी असा की मांसाहारी पिझ्झा ही अनेकांच्या पसंतीची गोष्ट (Pizza lovers) असते. मात्र तुम्ही जर शाकाहारी (vegetarian)असाल आणि ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला जर चुकून मांसाहारी पिझ्झाच (Non veg pizza)पाठवण्यात आला तर. अशी चूक केल्यानंतर पिझ्झा कंपनीला चांगलाच भूर्दंड बसला आहे. एका ग्राहक न्यायालयाने (Consumer court) शाकाहारी ग्राहकाला मांसाहारी पिझ्झा दिल्याबद्दल डॉमिनोजला ९.६५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या घटनेमुळे ग्राहकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. उत्तराखंडमधील (Uttarakhand)रुरकी येथील ही घटना आहे. (Pizza company faces fines of 9.65 lakh for delivering non veg pizza to vegetarian customer)
अधिक वाचा : ज्ञानवापी मशिदीबाहेर कडेकोट बंदोबस्त, सर्व्हे आजपासून पुन्हा सुरू होणार
एका ग्राहकाने 26 ऑक्टोबर 2020 रोजी ऑर्डर केली होती. तक्रारदार शिवांग मित्तल हे रुरकीच्या साकेत कॉलनीतील रहिवासी आहेत. त्यांनी व्हेज पिझ्झा आणि चोको लावा केकची ऑनलाइन ऑर्डर दिली होती. या ऑर्डरसाठी त्यांनी 918 रुपयांचे बिल भरले होते. मात्र शिवांगने ऑर्डर उघडताच त्याला एक विचित्र वास आला आणि त्याला उलट्या होऊ लागल्या. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांच्या कुटुंबातील कोणीही मांसाहारी नाही. आपल्याला मांसाहारी पिझ्झा डीलीव्हर करून पिझ्झा कंपनीने त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा केला आहे.
अधिक वाचा : Debris fell from space : अबब! गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील धक्कादायक घटना, अंतराळातून पडला रहस्यमयी ढिगारा...
त्यानंतर त्यांनी गंगनाहर पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दाखल केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांनी वेगवेगळ्या सरकारी विभागांकडे तक्रारही केली, पण कोणतीही कारवाई झाली नाही, असे हिंदी दैनिक दैनिक जागरणच्या वृत्तात म्हटले आहे.
पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची तड लागत नाही हे पाहिल्यावर तक्रारदाराने अखेरीस त्यांनी 3 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हा ग्राहक मंचाकडे संपर्क साधला. प्रकरणाच्या सुनावणीनंतर, ग्राहक मंचाचे अध्यक्ष कंवर सेन आणि इतर सदस्यांनी डॉमिनोस यांना सेवांमधील कमतरतेबद्दल दोषी ठरवले. न्यायालयाने कंपनीला जबरदस्त दंड केला. ग्राहक न्यायालयाने कंपनीला तक्रारदाराला एकूण 9.65 लाख रुपये दंड म्हणून देण्याचे आदेश दिले.
पिझ्झा ही अनेकांच्या आवडीची गोष्ट आहे. त्यातच पिझ्झाच्या ऑनलाइन डीलीव्हरीमुळे पिझ्झा खाणे आणखीच सोपे झाले आहे. कोरोना काळात तर ऑनलाइन फूड डीलीव्हरीच्या व्यवसाायत जोरदार वाढ झाली आहे. अनेक ग्राहक घरबसल्या पिझ्झा मागवत असतात. पिझ्झा हा दोन्ही श्रेणीत मिळतो. शाकाहारी आणि मांसाहारीदेखील. अर्थात मांसाहारी ग्राहक शाकाहारी पिझ्झाचादेखील आनंद घेतच असतात. मात्र शाकाहारी ग्राहकांना मांसाहारी पिझ्झा जवळदेखील नको असतो. अशात जर शाकाहारी ग्राहकाला मांसाहारी पिझ्झा पुढ्यात आला तर त्याचा संताप होणे साहजिकच आहे. त्यातही अनेकजण शाकाहारी अ्सण्यामागे त्यांच्या धार्मिक भावनादेखील असतात.