Places to visit in May: कमी बजेटमध्ये मे महिन्याच्या सुट्टीत फिरायला जायचे आहे? भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 16, 2023 | 13:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Places to visit in May: मे महिन्याच्या सुट्टीमध्ये स्वस्त दरात भारत भ्रमंतीच्या योजना जर आखत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट टूरिस्ट डेस्टिनेशन बद्दल माहिती देणार आहोत, जिथे तुमची उन्हाळ्याच्या सुट्टीचा मस्त लुटू शकता!

 समर व्हेकेशनची सुरुवात
मे महिन्याच्या सुट्टीसाठी स्वस्त आणि मस्त टूरिस्ट डेस्टीनेशन  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • मे महिन्यातील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण सुट्टीचे नियोजन करतात.
  • आता मे महिना येण्यासाठी अवघे १५ दिवस उरले असून मुलांच्या समर व्हेकेशनची सुरुवात देखील झाली आहे.
  • मे महिन्याच्या सुट्टीत स्वस्त आणि मनसोक्त फिरता येतील अशा भारतातील काही खास ठिकाणे

Perfect Tourist Place for May: सुट्टीवर बाहेर फिरायला जायला कोणाला नाही आवडणार? असे खूप कमी लोकं असतील ज्यांना सुट्टीत फिरायला आवडत नाही. अनेकवेळा सुट्ट्या न मिळाल्याने तर कधी परफेक्ट डेस्टिनेशन न ठरल्यामुळे प्लॅन्स रद्द होतात. त्यामुळे, सुट्टी आणि परफेक्ट टुरिस्ट प्लेस यांचा योग जुळून आणणे गरजेचे असते. तेव्हाच काय तुमची सुट्टी छान रंगात येईल! (places to visit in india in the month of may you can travel to these places in india)

मे महिन्यातील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण सुट्टीचे नियोजन करतात. आता मे महिना येण्यासाठी अवघे १५ दिवस उरले असून मुलांच्या समर व्हेकेशनची सुरुवात देखील झाली आहे. त्यामुळे तुम्ही मे महिन्याच्या सहलीची योजना जर आखत असाल तर,  आज आम्ही तुम्हाला अशाच काही पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही मे महिन्याच्या सुट्टीत  मनसोक्त फिरू शकता.

अधिक वाचा : ​मॉडेल नंदिनी गुप्ताचा मिस इंडिया प्रवास

मे च्या सुट्टीत भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

नैनिताल

मे महिन्यात नैनितालचे हवामान अतिशय आल्हाददायक असते. नैनीतालमध्ये तुम्ही नैनी तलाव, मॉल रोड, स्नो व्ह्यू पॉइंट आणि बोटॅनिकल गार्डन यांसारख्या निसर्गरम्य ठिकाणी आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत छान व्हेकेशन टाइम घालवू शकता.

मसुरी

मसुरी हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. मे महिन्यातसुद्धा मसूरीचे हवामान पर्यटनासाठी उत्तम मानले जाते. मसुरीमध्ये तुम्ही केम्प्टी फॉल्स, कंपनी गार्डन आणि लाल टिब्बा यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. यासोबतच पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंगचा थरार अनुभवू शकता.

शिमला

हनिमून डेस्टिनेशनसाठी शिमला उत्तम ठिकाण आहे. येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. शिमला हे मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी एक उत्तम हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही द रिज, कुफरी, मॉल रोड, जाखू मंदिर, क्राइस्ट चर्च आणि अर्की फोर्ट या ठिकाणांना भेट देऊ शकता. जर तुम्ही शिमलामध्ये सुट्टीसाठी जाणार असाल तर टॉय ट्रेनचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका.

अधिक वाचा : ​1 लाख डाऊनपेमेंट करा अन् Hyundai Venue घरी आणा

दार्जिलिंग

मे महिन्यात भेट देण्यासाठी दार्जिलिंग हे सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे. येथे तुम्ही टायगर हिल, रॉक गार्डन, सिंगलिला नॅशनल पार्कला भेट देण्यासोबतच टॉय ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

केरळ

कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी केरळ हे देखील मस्त आहे. येथे तुम्ही कन्नूर, मुन्नार, अलेप्पी, त्रिशूर आणि वायनाड सारख्या सुंदर ठिकाणी भटकंती करू शकता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी