Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमान कोसळलं; 72 प्रवाशांमध्ये 4-5 भारतीयांचाही समावेश

Nepal Aircraft Crash :  काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारं यति एअरलाइन्सचं एटीआर 72 विमान (plane) रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळलं. विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.  या दुर्घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Plane crashes in Nepal; 40 passengers died
नेपाळमध्ये विमान कोसळलं; 40 प्रवाशांचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • विमानात 4-5 भारतीय प्रवासीही होते अशी माहिती मिळाली आहे.
  • अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आलं आहे.
  • या विमान अपघातातील आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Nepal Aircraft Crash :नेपाळमधील (Nepal) पोखराजवळ(Pokhara)यति एअरलाइन्सचे ATR-72 (Yeti Airlines) विमान कोसळले आहे. काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारं यति एअरलाइन्सचं एटीआर 72 विमान (plane) रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळलं. विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.  या दुर्घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत.  (Plane crashes in Nepal; 72 passengers including 4-5 Indians )

अधिक वाचा  : Ghee Purity Check Tips: तुमच्या जेवणात बनवाट तूप तर नाही ना?

यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी मीडियाला सांगितलं की, जुनं विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.  अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान डोंगरावर आदळले आणि नदीत कोसळले. यानंतर विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. लँडिंगपूर्वी झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली. पोखराजवळ कोसळलेले प्रवासी विमान यती एअरलाईन्सचे असल्याचे समोर आले आहे.  या विमान अपघातातील आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या विमानात 4-5 भारतीय प्रवासीही होते अशी माहिती मिळाली आहे.  अपघातानंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी गृह मंत्रालय, सुरक्षा कर्मचारी आणि सर्व सरकारी यंत्रणांना तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. 

अधिक वाचा  : IND vs SL 3rd ODI : भारत विरुद्ध श्रीलंका, तिसरी वन डे मॅच

या अपघाताचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान दहल काठमांडू विमानतळावर रवाना झाले आहेत.  अपघातस्थळावरून एकूण 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य जिल्हा अधिकारी यांनी स्थानिक मीडियाला दिली.  नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरण (CAAN) नुसार, यति एअरलाइन्सच्या 9N-ANC ATR-72 विमानाने सकाळी 10:33 वाजता काठमांडू येथून उड्डाण केले. पोखरा विमानतळावर उतरत असताना जुने विमानतळ आणि नवीन विमानतळादरम्यान सेती नदीच्या काठावर हे विमान कोसळले. 

घटनेच्या अधिक माहितीसाठी 

नेपाल मधील भारतीय दूतावासचा हेल्पलाइन नंबर 

1. काठमांडू हेल्पलाइन नंबर- +977-9851107021 

2. पोखरा हेल्पलाइन नंबर- +977-9856037699

याआधीही भीषण अपघात 

दरम्यान गेल्या वर्षी वर्षी मे महिन्यात खराब हवामानामुळे पहारी मुस्तांग जिल्ह्यात तारा एअरचे विमान कोसळले होते. या घटनेत 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी