न्यू इयरमध्ये पार्टीचं आयोजन करताय? जाणून घ्या कोणत्या दिवशी असतील ड्राय डे

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 26, 2022 | 16:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

know these dry dates in marathi : ज्या दिवसांमध्ये सर्व शासनमान्य दारूच्या दुकानात विक्री सक्तीने बंद असते, त्या दिवसांना ड्राय डेज असे म्हणतात. त्या दिवशी तुम्ही मद्यपान करू शकता मात्र दारूची खरेदी करता येणार नाही.

planning to host party on 2023 know these dry dates in marathi
मित्रांना घरी बोलवण्यापूर्वी ड्राय डेजची यादी वाचा.   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • २०२३ मधील ड्राय डेजची ही यादी जाणून घ्या. 
  • दारू शिवाय पार्टी होऊ शकते.
  • पण तिला धमाकेदार आणि अविस्मरणीय करण्यासाठी दारु हवीच!

Dry dates in 2023, मुंबई : दारू शिवाय पार्टी होऊ शकते.  पण तिला धमाकेदार आणि अविस्मरणीय करण्यासाठी दारु हवीच!
जर आताच ही यादी लक्षात घेतली नाही, तर पार्टीत मित्रमंडळीं समोर तोंडघशी पडण्याची वेळ तुमच्यावर येईल. असा लाजिरवाणा प्रसंग टाळण्यासाठी मुंबई, दिल्ली, बंगळूर येथील दारूची दुकाने बंद राहाणार्या दिवसांची ही लिस्ट पाहूया.(planning to host party on 2023 know these dry dates in marathi)

ज्या दिवसांमध्ये सर्व शासनमान्य ठेक्यांमध्ये दारूची विक्री सक्तीने बंद असते, त्या दिवसांना ड्राय डेज असे म्हणतात.
त्या दिवशी तुम्ही मद्यपान करू शकता मात्र दारूची खरेदी करता येणार नाही.

संपूर्ण देशातील नानाविध राज्यांना राष्ट्रीय, पारंपारीक सणांच्या दिवशी शासनाच्या निर्देशामुळे ड्राय डेजचे सक्तीने पालन करावे लागते.ज्यात प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती यांचा समावेश होतो.  प्रत्येक राज्याच्या तत्कालीन  संस्कृतीनुसार /  परीस्थिनुसार ड्राय डेजचे नियोजन करण्यात येते. इलेक्शनच्या दिवसांमध्ये संपूर्ण देशात कुठेही मद्याची विक्री होत नाही. 

नवी दिल्ली - २०२३ मधील ड्राय डेजची यादी
 १४ जानेवारी - मकरसंक्रांती
 २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन
 ३० जानेवारी - महात्मा गांधी पुण्यतिथी
 
 ८ मार्च - होळी
 ३० मार्च - राम नवमी
 
 ४ एप्रिल - महावीर जयंती
 ७ एप्रिल - गुड फ्रायडे
 १४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
 २२ एप्रिल -  रमाझान ईद
 
 २९ जून - आषाढी एकादशी
 
 ३ जुलै - गुरू पौर्णिमा 
 २९ जुलै - मोहरम 
 
 १५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन
 
 ६ सप्टेंबर - जन्माष्टमी 
 १९ सप्टेंबर - गणेश चतुर्थी
 २८ सप्टेंबर - अनंत चतुर्दशी
 
 २ ऑक्टोबर - महात्मा गांधी जयंती 
 २४ ऑक्टोबर - दसरा
 २८ ऑक्टोबर - महर्षी वाल्मिकी जयंती 
 
१२ नोव्हेंबर - दिवाळी 
२७ नोव्हेंबर - गुरू नानक जयंती 

२५ डिसेंबर - नाताळ

 मुंबई - २०२३ मधील ड्राय डेजची यादी
  १४ जानेवारी - मकरसंक्रांती
 २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन
 ३० जानेवारी - शहीद दिवस
 
 १५ - स्वामी दया
 १८ - महाशिवरात्री
 १९ - छत्रपती शिवाजी महाराज जयंती
 
 ८ मार्च - होळी
 ३० मार्च - राम नवमी
 
 ४ एप्रिल - महावीर जयंती
 ७ एप्रिल - गुड फ्रायडे
 १४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
 २२ एप्रिल -   रमाझान ईद
 
 १ मे - महाराष्ट दिन 
 
 २९ जून - आषाढी एकादशी
 
 ३ जुलै - गुरू पौर्णिमा 
 २९ जुलै - मोहरम 
 
 ६ सप्टेंबर - जन्माष्टमी 
 १९ सप्टेंबर - गणेश चतुर्थी
 २८ सप्टेंबर - अनंत चतुर्दशी आणि ईद - ए - मिलाद 
 
 २ ऑक्टोबर - महात्मा गांधी जयंती 
 ८ ऑक्टोबर - संपूर्ण आठवडा दारूबंदी
 २४ ऑक्टोबर - दसरा
 २८ ऑक्टोबर - महर्षी वाल्मिकी जयंती 
 
 १२ नोव्हेंबर - दिवाळी
 २३  नोव्हेंबर  - कार्तिकी एकादशी
 २७ नोव्हेंबर - गुरू नानक जयंती 
 
 २५ डिसेंबर - नाताळ
 
बंगळूर -  २०२३ मधील ड्राय डेजची यादी
१४ जानेवारी - मकरसंक्रांती
 २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन
 ३० जानेवारी - शहीद दिवस
 
 ८ मार्च - होळी
 २२ मार्च  - उगडी
 ३० मार्च - राम नवमी
 
 ४ एप्रिल - महावीर जयंती
 ७ एप्रिल - गुड फ्रायडे
 १४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
 २२ एप्रिल -  रमाझान ईद
 
 १४  मे - बसवा जयंती
 
 २९ जून - आषाढी एकादशी
 
 ३ जुलै - गुरू पौर्णिमा 
 २९ जुलै - मोहरम 
 
 ६ सप्टेंबर - जन्माष्टमी 
 १९ सप्टेंबर - गणेश चतुर्थी
 २८ सप्टेंबर - अनंत चतुर्दशी आणि ईद - ए - मिलाद 
 
 २ ऑक्टोबर - महात्मा गांधी जयंती 
 २४ ऑक्टोबर - दसरा
 २८ ऑक्टोबर - महर्षी वाल्मिकी जयंती 
 
 १  नोव्हेंबर - कर्नाटक राज्येत्सव
१२ नोव्हेंबर - दिवाळी
 २७ नोव्हेंबर - गुरू नानक जयंती 
 
 २५ डिसेंबर - नाताळ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी