Indian Railway Rule in marathi: नवी दिल्ली प्रवाशी मित्रांनो रेल्वे( Railway) प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण भारतीय रेल्वे विभागाने (Department of Indian Railways)प्रवासाविषयी नियम बदलमध्ये बदल केली आहेत. रेल्वे प्रवास (travel) करत असताना तुम्ही आता तुमचा मोबाईल चार्ज करू शकणार नाहीत. यामुळे रेल्वे प्रवास करण्याआधी तुम्हाला तुमचा मोबाईल फुल चार्ज करावा लागेल. भारतीय रेल्वेच्या या नियमामुळे हजारो रेल्वे प्रवाशी (passenger) नाराज होतील. (Please charge your mobile while traveling by train, otherwise there will be trouble)
अधिक वाचा : काही मिनिटात उजळेल मुलांची त्वचा
प्रवाशांचं नाराज होणं साहजिक आहे, पण भारतीय रेल्वेने हा नियम लागू करण्यामागे एक मोठं कारण सांगितलं आहे. या कारणामुळे तुम्ही कदाचित या नियमाचे स्वागत कराल. भारतीय रेल्वेने हा नियम लागू करण्याचं कारण, प्रवाशांची सुरक्षा. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अनेकदा लोक रेल्वे प्रवास करत असताना रात्री मोबाईल फोन किंवा लॅपटॉप चार्ज करून झोपतात, ज्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका असतो. यामुळे रेल्वेत आग लागण्याची शक्यता असते. गेल्या काही आग लागण्याच्या घटनांमध्ये सॉकेटमधील शॉर्ट सर्किट हे मुख्य कारण अशल्याचं समोर आले आहे.
अधिक वाचा : केसांसाठी कडुलिंब आहे फायदेशीर, कोंड्याची समस्या होईल दूर
या घटना घडू नये यासाठी रेल्वेने रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत रेल्वेमध्ये मोबाईल चार्ज करण्यास बंदी केली आहे. याचे योग्यरितीने पालन होण्यासाठी, रात्री 11 नंतर फक्त सॉकेटचा मुख्य वीज पुरवठा बंद केला जाईल याची देखील खात्री केली जाते. ही नवीन सुरुवात नाहीये, कारण रेल्वेने 2021 मध्येच याबाबत सूचना जारी केल्या होत्या. पश्चिम रेल्वेने 16 मार्च 2021 रोजी चार्जिंग पोर्टमधील वीजपुरवठा बंद करून त्याची सुरुवात केली. याशिवाय 2014 मध्ये रेल्वे बोर्डाने सर्व झोनला तसे करण्याचे निर्देश दिले होते.
रेल्वेच्या डब्ब्यामध्ये आग लागण्याची घटना होऊ नयेत यासाठी ज्वलनशील पदार्थ रेल्वेमधून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच रेल्वेमध्ये धुम्रपान करण्यासही बंदी आहे. समजा तुम्ही रेल्वेमध्ये ज्वलनशील पदार्थ आणि धुम्रपान केले तर हा रेल्वे कायदा कलम 134 नुसार गुन्हा आहे.
अधिक वाचा : जलद वजन कमी करण्यासाठी टीप्स
या कायद्यानुसार 1000 रुपयांचा दंड आणि तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. किंवा दंड आणि शिक्षाही होऊ शकते. दरम्यान हे आदेश फक्त प्रवाशांसाठी नाहीत तर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी देखील आहेत. रेल्वे मंत्रालयाने निर्देश देताना म्हटलं होतं की , रेल्वेच्या कामकाजात सुरक्षितता केंद्रस्थानी असते आणि त्यात कोणतीही हलगर्जीपणा असू शकत नाही.
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नियम केले आहेत, त्यातील एक नियम म्हणजे रात्री टीसी तिकीट तपासण्यासाठी तुम्हाला झोपेतून उठवू शकत नाही. रात्री 10 वाजेपासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत या वेळेत टीसी तिकीट तपासण्यासाठी तुम्हाला झोपेतून उठवू शकत नाही.
पण जर तुम्ही रात्री 10 वाजेनंतर रेल्वे पकडली असेल तर तुम्हाला तिकीट दाखवावे लागेले. यासह प्रवाशी एसीच्या पहिल्या वर्गातील डब्ब्यात फक्त 40 किलो वजनी सामान घेऊ शकतो किंवा स्लीपर क्लासमध्ये प्रवाशी फक्त 15 किलो वजनी सामान घेऊ शकतो.