Veer Baal Diwas : २६ डिसेंबर वीर बाल दिवस म्हणून साजरा होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

Veer Baal Diwas साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ या वर्षापासून 26 डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून पाळला जाईल. श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पूरबचे पवित्र औचित्य साधून  पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत घोषणा केली आहे.

थोडं पण कामाचं
  • 26 डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस'
  • साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत घोषणा केली आहे.

Veer Baal Diwas : नवी दिल्ली : साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ या वर्षापासून 26 डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून पाळला जाईल. श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पूरबचे पवित्र औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत घोषणा केली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, "आज, श्रीगुरु गोविंद सिंगजींच्या प्रकाश पूरबच्या पवित्र दिवसानिमित्त, मला हे सांगताना गौरव वाटत आहे की या वर्षापासून, 26 डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' पाळला  जाईल. साहिबजादेंच्या न्यायासाठीच्या लढ्याला आणि  धैर्याला ही समर्पक श्रद्धांजली आहे. साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांना भिंतीत जिवंत बंद करण्यात आल्यामुळे ज्या दिवशी हौतात्म्य प्राप्त झाले त्याच दिवशी ‘वीर बाल दिवस’ असेल. या दोन महात्म्यांनी धर्माच्या उदात्त तत्त्वांपासून विचलित होण्याऐवजी मृत्यूला प्राधान्य दिले. माता गुजरी, श्री गुरु गोविंद सिंग आणि चार साहिबजादे यांचे शौर्य आणि आदर्श लाखो लोकांना शक्ती देतात. ते कधीही अन्यायापुढे झुकले नाहीत. त्यांनी सर्वसमावेशक आणि सलोखा असलेल्या जगाची कल्पना केली. त्यांच्याबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती कळणे ही काळाची गरज आहे, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले आहे. 

कोरोनावर बैठक

देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. आज दिवसभरात देशात कोरोनाचे एक लाख ५९ हजार रुग्ण आढळले आहेत. तर ३२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री, आरोग्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. अजूनही कोरोना संपला नाही, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या बैठकीत दिल्या होत्या. तेव्हापासून भारात कोरोना रुग्णांची संख्या वाढून सहा लाख रुग्णांच्या घरात गेली आहे. सध्या देशात पुन्हा कोरोना वाढत असून सामान्य नागरिक, आरोग्य कर्मचारी, सामान्य नागरिक, संसदेचे कर्मचारी, न्यायालयाचे कर्मचारी आणि न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीत या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुंबईतही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी