PM Modi : पंतप्रधान मोदी जनतेशी संवाद साधणार, महत्त्वाच्या विषयावर बोलणार

PM encourages citizens to share inputs and highlight inspiring efforts for 99th episode of Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत. अनेकांचे लक्ष पंतप्रधान काय बोलणार याकडे आहे.

PM Modi
पंतप्रधान मोदी जनतेशी संवाद साधणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान मोदी जनतेशी संवाद साधणार
  • महत्त्वाच्या विषयावर बोलणार
  • पंतप्रधानांच्या बोलण्याकडे अनेकांचे लक्ष

PM encourages citizens to share inputs and highlight inspiring efforts for 99th episode of Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत. अनेकांचे लक्ष पंतप्रधान काय बोलणार याकडे आहे.

पंतप्रधान मोदी 99 व्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत. 

पंतप्रधानांनी 99 व्या मन की बात कार्यक्रमात कोणकोणत्या विषयांवर प्रामुख्याने बोलावे अशी जनतेची इच्छा आहे, हे जाणून घेण्यासाठी देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांकडून त्यांची मते मागवली आहेत. नागरिकांनी पाठवलेल्या संदेशांची दखल घेऊन पंतप्रधान निवडक महत्त्वाच्या विषयांवर मन की बात कार्यक्रमात बोलतील. तसेच त्यांचे स्वतःचे म्हणणे पण जनतेपुढे मांडतील. 

पंतप्रधान मोदींचा 99 वा मन का बात कार्यक्रम रविवार 26 मार्च 2023 रोजी दूरदर्शनवर प्रसारित होणार आहे. देशातील सर्व प्रमुख सरकारी आणि खासगी वृत्तवाहिन्यांवर मन का बात कार्यक्रम सादर होणार आहे. 

मन की बात कार्यक्रमाकरिता विषय सुचविणे, माहिती पुरविणे यासाठी नागरिक थेट 1800-11-7800 वर संपर्क साधू शकतात. नागरिक सुचवत असलेल्या विषयांमुळे सरकारी योजनेचे नियोजन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या विचारांना नवी दिशा मिळत आहे. यामुळे ही प्रक्रिया महत्त्त्वाची आहे. याच कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना मन की बात कार्यक्रमासाठी सूचना आणि प्रतिक्रिया देण्याचे आवाहन केले आहे.

पांढरा कांदा खाण्याचे फायदे

हे उपाय करा आणि Heart Attack चा धोका नैसर्गिकरित्या कमी करा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी