PM Kisan 11th Installment | पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील (PM KIsan scheme) अकराव्या टप्प्याची (Installment) रक्कम (Amount) केंद्र सरकारनं लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात (Bank Account) जमा केली आहे. एकूण 10 कोटी शेतकऱ्यांना 21 हजार कोटींच्या रकमेचं वाटप करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दर वर्षी 6000 रुपयांची मदत केली जाते. मात्र असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. अशा शेतकऱ्यांनी चिंता न करता केवळ एक फोन करून माहिती घ्यावी आणि तक्रार करावी, असं आवाहन मोदी सरकारकडून करण्यात आलं आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अकराव्या टप्प्याचे 2 हजार रुपये जमा झाले नाहीत, ते हेल्पलाईन नंबरवर फोन करून तक्रार नोंदवू शकतात. 18001155266 हा पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठीचा हेल्पलाईन नंबर आहे. याशिवाय ईमेल पाठवूनही तुम्ही यााबाबतची तक्रार नोंदवू शकता. pmkisan-ict@gov.in किंवा pmkisan-funds@gov.in या पत्त्यावर ईमेल पाठवला तरी तुमच्या तक्रारीची योग्य ती दखल घेतली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे.
हेल्पलाईन नंबर - 011-24300606,155261
टोल फ्री नंबर - 1800-115-526
ज्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत, त्यातील बहुतांश जणांनी KYC ची प्रक्रिया पूर्ण केलेली नसावी, असा अंदाज व्यक्त कऱण्यात येत आहे. e-KYC प्रक्रिया 31 मे पूर्वी पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलं होतं. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांनाही ही अट लागू करण्यात आली होती. ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती पूर्ण करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेची रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे.
असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांना यापूर्वीच्या दोन्ही टप्प्यातील रक्कम मिळालेली नाही. कुठल्या ना कुठल्या तांत्रिक कारणामुळे त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकलेली नाही. या तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर केवळ याच टप्प्याची रक्कम मिळणार, की पूर्वीचीही मिळणार, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. पीएम किसानच्या वेबसाईटवर याचं उत्तर देण्यात आलं आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्याने तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर त्याला संपूर्ण रक्कम मिळणार आहे. यापूर्वीच्या दोन टप्प्यांची रक्कम मिळाली नसेल तर तांत्रिक बाबी पूर्ण केल्यावर सरसकट 6000 रुपयांची रक्कम खात्यावर जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही, त्यांनी तातडीने हेल्पलाईन नंबरवर फोन करून रक्कम जमा न होण्यामागचा कारणांचा शोध घ्यावा आणि त्या कारणांची पूर्तता करावी, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.