आज रात्री १२ वाजेपासून संपूर्ण देशात पुढील २१ दिवसांसाठी लॉकडाऊन: मोदी

कोरोना व्हायरसने देशात थैमान घातलं आहे. तसंच कोरोना बाधित रुग्णांमध्ये देखील वाढ होत आहे. हीच गोष्ट लक्षात घेता आता संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा मोदींनी केली.

pm modi address the nation on vital aspects relating to the menace of covid 19 live speech
आज रात्री १२ वाजेपासून संपूर्ण देशात पुढील २१ दिवसांसाठी लॉकडाऊन: मोदी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार
 • कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपासंबंधी काही महत्त्वपूर्ण गोष्टी पंतप्रधान मोदी देशाला सांगणार
 • देशात कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यात सतत होत आहे वाढ

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळे चिघळत चाललेली परिस्थिती लक्षात घेता आज (२४ मार्च २०२०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी असं जाहीर   केलं की, 'आज रात्री १२ वाजेपासून संपूर्ण देशात पुढील २१ दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे. हा एक प्रकारचा कर्फ्यूच आहे.' अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान मोदींनी यावेळी केली. 'घरातून बाहेर न पडणं हाच आज कोरोनावरचा उपाय आहे. त्यामुळे पुढील २१ दिवस आपण कुणीही घरातून बाहेर पडू नका.' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अत्यंत कळकळीचं आवाहन केलं आहे.  

पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण

'घराचा उंबरठा लक्ष्मणरेषा आहे लक्षात ठेवा'

'जगातील अनेक बलाढ्य देश हे कोरोना व्हायरसमुळे हतबल झाले आहेत. यापैकी अनेक देश हे वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत फार परिपूर्ण आहेत. मात्र तरीही या देशांमध्ये आज कोरोनाने अक्षरश: थैमान घातलं आहे. येथील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी आपण या देशांला आलेल्या अनुभवातून शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाला आपल्या देशाला वाचविण्यासाठी आपआपल्या घरात राहणं हाच एकमेव उपाय आहे. आपल्या घराचा उंबरठा हा आपल्यासाठी एक लक्ष्मणरेषा आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे अजिबात घराबाहेर पडू नका.' असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं

'अत्यावश्यक सेवा सुरु राहतील' 

सध्या सोशल डिस्टन हा एकमेव पर्यात आहे. काही लोकांच्या एका चुकीमुळे तुमच्या कुटुंबाला, मित्रांना आणि देशाला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं. ज्याची किंमत ही संपूर्ण देशाला मोजावी लागेल. अशावेळी आपण आपल्या घरात थांबणं हेच योग्य आहे. जरी आपण आपल्या घरात थांबत असल्यात तरी इतर गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही. कारण की, अत्यावश्यक सेवा या सुरुच राहणार आहेत. त्यामुळे घाबरुन जाण्याची अजिबात गरज नाही.' असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं. 

'हा प्रकारचा कर्फ्यूच आहे'

'जनता कर्फ्यूनंतर संपूर्ण देशात लॉकडाऊनचा निर्णय घेणं हे कठोर आहे. पण तो सध्याच्या परिस्थितीत अत्यंत आवश्यक आहे. या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसणार आहे. पण भारतीयांना वाचवणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे पुढील २१ दिवस हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या २१ दिवसात आपण अजिबात घराबाहेर न पडता असाल तिथेच थांबा. कारण हा लॉकडाऊन म्हणजे एक प्रकारचा कर्फ्यूच आहे.'

'...तर आपण २१ वर्ष मागे जाऊ'

कोरोना व्हायरसची साखळी तोडायची असेल तर किमान २१ दिवस आपण सर्व जण घरात राहणं गरजेचं आहे. जर या २१ दिवसात आपण सावरू शकलो नाही तर आपला देश हा जवळजवळ २१ वर्ष मागे पडेल. त्यामुळे पंतप्रधान म्हणून नाही तर एक तुमच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणून मी तुम्हाला अत्यंत कळकळीने सांगतो आहे की, पुढील २१ दिवस हे प्रचंड महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपण अजिबात घरातून बाहेर पडू नका.' असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 1. आपण देशात जिथे आहात तिथेच राहा, आताची परिस्थिती पाहता पुढील ३ आठवडे म्हणजे २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊन असणार आहे. 
 2. १ संक्रमित व्यक्ती एका आठवड्यात शेकडो लोकांना याचा संसर्ग पोहचवू शकतो. 
 3. सार्वजनिक ठिकणी सॅनिटाईज करणं सुरु
 4. मीडियाच्या लोकांबद्दल देखील विचार करा, ते आपला जीव धोक्यात घालून आपल्यापर्यंत बातमी पोहचवत आहेत
 5. कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारचे १५ हजार कोटीच्या विशेष पॅकेजची तरतूद केली आहे. 
 6. सर्व राज्याच्या सरकारांना सांगितलं आहे. आरोग्य हीच पहिली प्राथमिकता असली पाहिजे. 
 7. माझा तुम्हाला आग्रह आहे की, अफवा आणि अंधश्रद्धा यापासून दूर राहा 
 8. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आरोग्य खात्यांकडून सांगण्यात येणाऱ्या गोष्टींचं पालन करा 
 9. डॉक्टरांच्या सल्लाशिवाय कोणंतही औषध घेऊ नका 
 10. हा आजार आगीसारखा झपाट्याने पसरत आहे. 
 11. दोन लाख  लोकांपर्यंत ११ दिवस लागले 
 12. दोन लाखाहून तीन लाखापर्यंत पोहचण्यासाठी ४ दिवस लागले. 
 13. जेव्हा संक्रमण सुरु होतं तेव्हा याला थांबवणं कठीण असतं 
 14. चीन, अमेरिका, जर्मनी, स्पेन, इटली, इराण या देशात कोरोना पसरणं सुरु झालं तेव्हा तेथील अवस्था बिकट झाली. 
 15. या देशातील वैद्यकीय सेवा अत्युच्च आहे. तरीही हे देश कोरोनाचा प्रभाव कमी करु शकले नाही. 
 16. अशावेळी आशेचा किरण काय आहे? तर कोरोनाशी लढण्याचा आशेचा किरण म्हणजे या देशांकडून आपल्याला मिळालेला अनुभव 
 17. या देशातील अनेक आठवडे घराबाहेर पडले नाही. त्यामुळे आता हे देश कोरोना व्हायरसच्या विळख्यातून बाहेर पडत आहेत.  
 18. लॉकडाऊन हा तीन आठवड्याचा असणार आहे. 
 19. येते २१ दिवस हे प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 
 20. कोरोना व्हायरसची चैन तोडण्यासाठी २१ दिवसांचा वेळ हा अत्यंत आवश्यक आहे. 
 21. जर हे २१ दिवस आपण घरी नाही राहू शकलात तर आपला देश २१ वर्ष मागे जाईल. 
 22. आपलं कुटुंब हे उद्धवस्त होईल. ही गोष्ट मी पंतप्रधान म्हणून सांगत आहे. 
 23. मी एकच गोष्ट सांगत आहे की, या लॉकडाऊनने लक्ष्मणरेखा खेचली आहे. 
 24. आपल्या एका चुकीमुळे आपलं संपूर्ण कुटुंब उद्धवस्त होऊ शकते. 
 25. आपल्या घरात राहा, बाहेर पडू नका 
 26. आज रात्री १२ वाजेपासून संपूर्ण देशात संपूर्ण लॉकडाऊन होणार आहे. 
 27. घरातून बाहेर निघण्यावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. 
 28. हा एक प्रकारे कर्फ्यू आहे. जनता कर्फ्यूपेक्षाही थोडं अधिक कठोर हे पाऊल आहे. 
 29. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचं भाषण सुरु

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...